शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी

By admin | Updated: July 8, 2015 23:28 IST

पृथ्वीराज चव्हाण : मलकापूर येथील कार्यक्रमात सत्ताधाऱ्यांवर टीका

मलकापूर : ‘राज्याचे राजकारण सध्या कोणत्या दिशेला जात आहे, याचा शोध घेण्याची गरज आहे. बहुमताची सत्ता मिळालेल्या भाजप सरकारमधील भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे सरकार दिशाहीन बनत असल्याचे चित्र असून, राज्यकर्त्यांकडून मूलभूत विचारालाच तडा जात आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी व्हावी,’ अशी मुख्य मागणी विधिमंडळात करणार असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. मलकापूर, ता. कऱ्हाड येथील विविध विकासकामांच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, राजेंद्र मुळक, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा सुनंदा साठे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, ‘कितीही स्थित्यंतरे झाली तरी योग्य विचाराला साथ देणे हा महाराष्ट्रातील जनतेचा इतिहास आहे. राजकारणात बदल हे तर होतच असतात; मात्र योग्य विचाराला जनता योग्यवेळी नेहमीच साथ देते. मात्र विद्यमान सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे, हे विशेष. हवामान बदलामुळे सध्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. मराठवाडा तर पूर्णपणे कोरडाच आहे. पावसावर अवलंबून असलेली शेती व शेतकरी यामुळे मोठ्या अडचणीत सापडला आहे. पर्याय म्हणून त्यासाठी नवीन प्रयोग करणे गरजेचे आहे. आघाडी शासनात आम्ही दहा लाख जनावरांना चारा छावणीच्या माध्यमातून चारा पुरवला होता. तर पाच हजार पाचशे टँकरने दुष्काळी भागात पाणी पुरवठा केला होता. अशा पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला होता. पण सध्याचे युती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने एकही सकारात्मक निर्णय घेण्याचे औदार्यही दाखवित नाही, ही बाब गंभीर आहे. शेतकऱ्यांचे व जनतेचे हे सर्व प्रश्न घेऊन येणाऱ्या अधिवेशनात शासनाला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.’ (प्रतिनिधी)विधिमंडळात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आघाडी शासनाच्या काळात आम्ही प्रत्येक अडचणीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो. नेमके आज ते चित्र उलटे झाले आहे. जनतेची दिशाभूल करून निवडून आलेल्या सरकारने आजपर्यंत कोणतीही मदत दिलेली नाही. हे सरकार पूर्णपणे दिशाहीन आहे. या दिशाहीन सरकारच्या विरोधात आगामी काळात विधिमंडळात काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी स्पष्ट केले.