शहरं
Join us  
Trending Stories
1
White House Shooting: गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता प्रत्येक विदेशी नागरिकाला..."
2
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
3
आधारवर नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी फक्त 'ही' कागदपत्रे आवश्यक, UIDAI चा मोठा बदल
4
"बायकोचा बैल झालाय, आमचं ऐकत नाही"; आई वडिलांच्या टोमणे असह्य, लेकाने दोन्ही मुलांसह स्वतःला संपवलं
5
No Liquor On Highway: हायवेवर दारूविक्रीला 'ब्रेक'! उच्च न्यायालयाचा निर्णय; दुकानांचे परवाने रद्द करण्याचे आदेश
6
धक्कादायक! ज्याला मुलगा मानले, त्याच्यासोबतच प्रेमसंबंधाचे टोमणे, दोन सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
7
"ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच घरी जाऊन..."; नीलेश राणेंच्या 'स्टिंग ऑपरेशन'वर भाजप प्रदेशाध्यक्षांचे थेट प्रत्युत्तर
8
नोकरी सोडली किंवा काढलं, आता २ दिवसांत होणार फुल अँड फायनल सेटलमेंट! नव्या 'लेबर लॉ'नं बंदलला खेळ
9
कोट्यवधी कर्जदारांना RBI चा मोठा दिलासा! क्रेडिट स्कोअरबाबत मोठा निर्णय; कर्ज आणि EMI त्वरित होईल स्वस्त!
10
Mohammed Siraj: "एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातून प्रवास करू नका" सिराज असं का म्हणाला?
11
लोकगायिका नेहा सिंह राठोड झालीय बेपत्ता? संपर्क नाही, नोटिशीला उत्तरही नाही, पोलीस घेताहेत शोध
12
माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती
13
Donald Trump: "खूप मोठी किंमत मोजावी लागेल" व्हाईट हाऊस जवळील गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले!
14
शेतकरी कर्जवसुलीस एक वर्षाची स्थगिती; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा
15
Mumbai Video: वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशि‍लात, व्हिडीओ व्हायरल
16
देशातील सर्वात महागडी नंबर प्लेट, कोट्यवधीमध्ये झाली विक्री, एवढ्या किमतीत आली असती एक आलिशान कार
17
आईच्या नावे पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये महिन्याला गुंतवा ₹४०००; मॅच्युरिटीवर मिळेल लाखोंचा फंड, पैसाही सुरक्षित
18
चार-पाच लोकांमध्ये झाली होती 'सीक्रेट डील'; शिवकुमार यांचा माघार घेण्यास नकार, काँग्रेस काय करणार?
19
पुण्यात तीन लाख, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ९२ हजार बोगस मतदार; उद्धवसेनेचा आरोप
20
धर्मेंद्र यांची संपत्ती नको, फक्त 'ती' एक गोष्ट हवी; लेक अहाना देओलने व्यक्त केलेली इच्छा
Daily Top 2Weekly Top 5

सावधान...रात्र ‘लक्ष्मीदर्शना’ची

By admin | Updated: October 12, 2014 23:30 IST

प्रचाराची आज सांगता : उमेदवार, कार्यकर्त्यांवर प्रशासनाची करडी नजर

सातारा : जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघात शनिवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात जेवणावळी सुरू झाल्या आहेत. त्यातच प्रमुख उमेदवारांनी मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ देण्यासही सुरुवात केल्याची चर्चा जोरात सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. परिणामी उमेदवार आणि राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे.जिल्ह्यात आठही विधानसभा मतदारसंघांतील प्रचाराची सांगता सोमवार, दि. १३ रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. बुधवारी, दि . १५ रोजी मतदान होणार असून, रविवार, दि. १९ रोजी मतमोजणी आहे. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनी प्रचाराच्या तीन फेऱ्या पूर्ण केल्या असून, आता चौथी फेरी सुरू आहे. रविवारी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांच्या सांगता सभा मतदारसंघातील प्रमुख शहर आणि गावांमध्ये झाल्या. यावेळीही उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जेवणावळी सुरू झाल्या आहेत. या जेवणावळींचा खर्च लाखोंच्या घरात असल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात सातारा, कोरेगाव, फलटण, वाई, माण, कऱ्हाड उत्तर, कऱ्हाड दक्षिण आणि पाटण हे आठ विधानसभा मतदारसंघ असून, एकूण उमेदवारांची संख्या ८७ उमेदवार इतकी आहे. सर्व मतदारसंघाचा विचार करता कऱ्हाड दक्षिण आणि माणची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनही सज्ज झाले आहे. आठ विधानसभा मतदारसंघांत एकूण २,९५० मतदान केंद्रे आहेत. मतदान यंत्रे आणि कर्मचारी पोहोचविण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. (प्रतिनिधी)भरारी पथक रिकाम्या हातांनी परतनिवडणूक कालावधीत नियुक्त केलेल्या भरारी पथकाने रविवारी जिल्हा परिषद सदस्य किरण साबळे-पाटील यांच्या शिवथर येथील निवासस्थानी धाड टाकली; मात्र काहीच सापडले नसल्यामुळे भरारी पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. साबळे-पाटील यांच्या निवासस्थानी दुपारी साहित्य व्यवस्थापन नोडल अधिकारी शमा ढोक-पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भरारी पथक पोहोचले आणि तपासणी सुरू झाली. जवळपास अडीच तास तपासणी चालली होती. घरातील प्रत्येक कोपरा, डबे आणि धान्याची पोती पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. साबळे-पाटील यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी याची माहिती विचारली असता त्यांना काही सांगण्यात आले नाही. मात्र पथक रिकाम्या हाताने परतल्याची चर्चा चांगलीच रंगली.