शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातील पायऱ्या सर्व्हेत गायब...

By admin | Updated: December 17, 2015 22:54 IST

सातारा : सदरबझारमधील नागरिक काम बंद पाडण्याच्या पवित्र्यात

सातारा : सदर बझार येथील कण्हेर उजव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दर्गा जवळील पुलालगत असलेल्या कालव्यातील दोन्ही बाजूंच्या पायऱ्या मुकादमाच्या सर्व्हेत नसल्याने दुरुस्तीत त्या गायब झाल्या आहेत. ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी त्याबाबत विचारणा केली. त्यावर संबंधितांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने नागरिकांनी काम बंद पाडण्याचा पवित्रा घेतला आहे. येथील सदर बझारमधील दर्गा पुलापासून लक्ष्मी टेकडीपर्यंत कालवा दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. मागील अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांनी कालव्याच्या गळती बद्दल दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्तीचे काम मुकादमाच्या देखरेखीखाली सुरू आहे. यावेळी येथील दोन्ही बाजंूच्या पायऱ्या काढून प्लास्टर करण्यात आले. ही बाब काही महिलांनी संबंधितांना सांगितली.परंतु त्याकडे दुर्लक्ष करत काम सुरूच ठेवण्यात आले. त्यानंतर सदर बझार येथील काही नागरिकांनीही या पायरी विषयी विचारले असता मुकादमाने सांगितले की मी जवळ पास १९८० सालापासून या कालव्याचा सर्व्हे करत असून, या ठिकाणी पायऱ्याच नव्हत्या. त्यामुळे नागरिकही चांगलेच चक्रावले. त्यानंतर नागरिकांनी पायऱ्या असल्याचे पुरावे दाखवण्यास संमती दाखवली असता मुकादमाने संबंधित कार्यालयात व ठेकेदाराला फोन करून हात वर केले.पायऱ्याबाबत झालेला सर्व्हे चुकीचा असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु याला कोणीही जुमानत नसल्याने एकमेकाकडे टोलवा-टोलवी सुरू होती. शेवटी नागरिकांनी काम बंद पाडण्याचा इशारा देताच पायऱ्या करण्याचे आश्वासन दिले गेले. दरम्यान, या परिसरातील लोकसंख्येचा विचार करता कालव्याच्या सुरुवातीपासून पायऱ्या करण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा देखील येथील नागरिकांना होत आहे. उन्हाळ्यात अगदी वापरण्यासाठी पाणी देखील या कालव्यातून नागरिक घेत असतात. जनावरेही पाणी पिण्यासाठी याच पायऱ्याचा वापर करत असतात. त्यामुळे मुकादमाने केलेला हा सर्व्हे किती योग्य आहे. याची शहानिशा करावी असेही नागरिकांनी ठेकेदाराला सांगितले. (प्रतिनिधी)अखेर चूक मान्य...पायऱ्या विषयी वाद सुरू असताना नागरिकांनी ‘लोकमत’ कार्यालयात फोन केला. कालव्याचे फोटो काढताच ठेकेदार आणि मुकादमाने आपली चूक मान्य केली, आणि येथे पायऱ्या करून देतो असे आश्वासन देऊ लागले. पायऱ्यासाठी अर्ज द्यामुकादमाने लावलेल्या फोनवर अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पायऱ्या बांधू पण तुम्ही आम्हाला अर्ज द्या. यावर नागरिकांनी अर्ज कशासाठी असा प्रश्न केला. पूर्वीपासूनच येथे पायऱ्या आहेत. त्यामुळे अर्ज देण्याचा संबंधच नाही. पूर्वीप्रमाणेच या ठिकाणी दोन्ही बाजूने पायऱ्या ठेवाव्यात असे नागरिकांनी ठणकाविले.