शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

नीरा कालव्यावरून अधिकाऱ्यांसोबत ‘कालवा’

By admin | Updated: June 2, 2016 01:06 IST

तहसीलदारांच्या दालनात वादावादी : पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

फलटण : नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चुकीचे झाल्याचा आरोप करीत तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात काँग्रेसचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यकारी अभियंता सिद्धमल, उपअभियंता बडबडे यांना फैलावर घेतले. दरम्यान, या नियोजनास आपण स्वत: जबाबदार नसून ‘कालवा समिती’चा हा निर्णय असल्याची लेखी कबुली सिद्धमल यांनी दिलीे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी फलटण येथे तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते. यावेळी स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे महेंद्र बेडके, सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुका अध्यक्ष शिवाजीराव फडतरे आदी उपस्थित होते. ‘जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत वेळोवेळी हे आवर्तन चुकीचे ठरणार आहे, असे निदर्शनास आणून दिले होते. सद्य परिस्थितीत हा प्रकार जरी योग्य वाटत असला तरी ऐन उन्हाळ्यात मात्र याचे गंभीर परिणाम होणार असल्याची कल्पनाही आपण दिली होती. सलग दोन आवर्तने देऊ नये, असेही सुचविले होते. मात्र, तरीही ही आवर्तने आपण का सोडलीत? कोणाच्या सांगण्यावरून सोडलीत? तुमचा बोलवता धनी कोण आहे? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे,’ असे सवाल करीत रणजितसिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ‘नीरा उजवा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन कोणी चुकवले?’ असा सवाल उपस्थितांनी सिद्धमल यांना केला. दरम्यान, रणजितसिंह यांनी ‘नीरा उजवा कालवा समितीचा हा निर्णय असेल तर तसेच आम्हाला लेखी लिहून द्या,’ असे सांगितले व यास सिद्धमल तयारही झाले. यावेळी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार विजय पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातून नीरा उजवा कालवा जात असतानाही या भागातील बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती कोणामुळे निर्माण झाली, याची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. धरणात हक्काचे पाणी शिल्लक असताना उसाची पिके जळून जातात, यामागे तालुक्यातील कारखानदारी मोडकळीस आणण्याचा डाव दिसत आहे. ज्यांनी हे प्रयत्न केले आहेत, त्यांची नावे जाहीर करावीत. अन्यथा दि. ६ रोजी तहसील कार्यालयासमोर आम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत.’ (प्रतिनिधी) ‘कमिन्स’च्या पाण्यावरून रणकंदन ‘नीरा उजवा कालव्यावरून सायफनद्वारे कमिन्स कंपनी पाणी नेत आहे, यास अधिकृत परवानगी आहे का?’ असे नानासाहेब इवरे यांनी विचारले. सिद्धमल यांनी ‘परवानगी नसेल तर कमिन्सवर कारवाई करण्यात येईल,’ असे स्पष्ट केले. तेव्हा, ‘कमिन्सचे पाणी बंद करा व तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी द्या,’ असे रणजितसिंह यांनी सांगितले. यावर ‘आपण उद्या स्वत: कमिन्स कंपनीस भेट देऊन पाहणी करणार असून, तत्काळ पंचनामा करून कारवाई केली जाईल,’ असे सिद्धमल यांनी स्पष्ट केले. ‘मात्र संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पाणी चोरीचा गुन्हाही दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी इवरे यांनी शेवटी केली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मागण्या : ४दुष्काळी भागातील ऊस, डाळिंब व इतर खरिपाच्या पिकांचे तत्काळ पंचनामे व्हावेत. ४एकरी ८० टन ऊस उत्पादन गृहीत धरून एफआरपीप्रमाणे शासनाने पीक विमा व नैसर्गिक आपत्ती योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत. ४डाळिंबासाठी एकरी ४ लाख रुपये उत्पादन गृहीत धरून ते पैसे त्यांच्या खात्यावर जमा करावेत. ४शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत. ४नीरा उजवा कालवा समिती बरखास्त करावी. ४पाणी सोडण्याचे अयोग्य नियोजन करणाऱ्या संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.