शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर टिच्चून एसटी बस उभीच!--परजिल्ह्यातील बसेसचे काय?

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

प्रशासन लागले कामाला खंडाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्या बसचालकांना सूचना

शिरवळ : पारगाव, ता. खंडाळा येथे महामार्गावर काल (रविवारी) झालेल्या भीषण अपघातात आठ जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी महामार्गावर बस थांबवू नयेत, असे आदेश दिले. या घटनेला चोवीस तास उलटत नाहीत तोवरच सोमवारी पुन्हा महामार्गावर बस थांबून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरूच होता.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव गावच्या हद्दीत एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांवर कंटेनर उलटून आठ जण ठार झाले. या घटनेनंतर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिकांनी केलेल्या तक्रारीनुसार मंत्री पाटील, जिल्हाधिकारी मुदगल यांनी एसटी बसेस महामार्गावर न थांबविता बसस्थानक व अधिकृत बसथांब्यांवर थांबवाव्यात, असे आदेश दिले होते. मात्र, अपघाताच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी एसटी प्रशासनाकडून आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याचे दिसून आले आहे.दरम्यान, महामार्गावर बसेस थांबू नयेत, यासाठी खंडाळा व शिरवळ पोलीस ठाण्यांच्या वतीने महामार्गावर प्रवासी घेण्यासाठी थांबणाऱ्या एसटी बसेस व इतर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने आदेश दिले असले तरी एसटी महामंडळाकडून त्याचे पालन होणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे. (वार्ताहर)महामार्गावर कर्मचारी तैनातपारगाव येथे बसेस बसस्थानकात पाठविण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले होते. मात्र, शिरवळ येथे उलट परिस्थिती दिसून आली. याठिकाणी महामार्गावरच एसटी बसेस थांबताना दिसून येत होत्या. पोलीस कारवाई करत असले तरी त्यांनाही जुमानत नसल्याचे पाहायला मिळत होते. कंटेनरचालकाला न्यायालयीन कोठडीपारगाव, ता. खंडाळा येथील आठ प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक करण्यात आलल्या कंटेनरचालकाला खंडाळा न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. नवनाथ आजिनाथ गिते (वय २७, रा. पांगूळगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) असे कंटेनरचालकाचे नाव आहे.अनधिकृत थांबेमहामार्गावर शिंदेवाडी फाटा, लॉकिम फाटा, शिर्के कॉलनी फाटा, शिरवळ पोलीस दूरक्षेत्र कार्यालयासमोर, जगताप हॉस्पिटलसमोर, निप्रो कंपनी फाटा, केसुर्डी फाटा, पारगाव शहीद जवान सुनील यादव कमानीसमोर, खंबाटकी घाटाजवळील जुना टोलनाका याठिकाणी अनधिकृत थांबे आहेत.परजिल्ह्यातील बसेसचे काय?पारगाव येथील अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने एसटी बसेस महामार्गावर न थांबविण्याचे आदेश दिले असले तरी कोल्हापूर, सांगली, परळ, मुंबई आदी जिल्ह्यातील आगारांतून येणाऱ्या बसेस प्रत्येक बसस्थानकात जात नाहीत. महामार्गावर थांबूनच प्रवाशांना घेत असल्याचे पाहायला मिळते.अपघातानंतर पोलिसांनी सूचना देण्याचे काम सुरू केले आहे. अनेक वर्षांची सवय मोडणे हे जिकिरीचे काम आहे. त्यासाठी प्रवाशांनीही जागृत व्हावे. धोकादायक ठिकाणी थांबू नये.- अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, खंडाळामहामार्गावर व खंबाटकी घाटात धोकादायक ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. खंडाळ्याच्या उड्डाणपुलावरही प्रवाशांसाठी सूचना फलक लावण्याची व्यवस्था केली आहे. ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.- के. पी. मिरजकर, बांधकाम अभियंताप्रशासन लागले कामालाखंडाळ्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्या बसचालकांना सूचनाखंडाळा : सातारा-पुणे महामार्गावर पारगाव-खंडाळा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा नाहक बळी गेला. या घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून महामार्गावर असणारे अनधिकृत बसथांबे रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सकाळपासून कामाला लागली होती.अपघात झालेल्या ठिकाणी सोमवारी सकाळपासून नेहमीप्रमाणे वाहतूक चालूच होती. मात्र, प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या हा प्रकार लक्षात येताच पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी महामार्गावर उभे राहून प्रवाशांना बसस्थानकाकडे जाण्याच्या सूचना केल्या. लांब पल्ल्याच्या गाड्या महामार्गावरूनच जात असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय असल्याने सर्व पोलिसांनी सूचना देऊन बसेस बसस्थानकात पाठविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली.त्यामुळे सकाळपासून महामार्गावर दिसणारी गर्दी किमान आजच्या दिवशी तरी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. मात्र, एसटी महामंडळाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाहनचालकांना सूचना करण्यासाठी फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)पुण्याकडे जाणाऱ्या बस थेटउड्डाणपूल झाल्यापासून महामार्गावरच बसथांबा बनला आहे. कर्नाटक, कोल्हापूर, सांगली व अन्य ठिकाणांहून पुण्याकडे दिवसभरात पाचशेपेक्षा जास्त बसफेऱ्या होतात. पुण्याहून सातारकडे येणाऱ्या बस खंडाळा बसस्थानकात येतात. मात्र, पुण्याकडे जाणाऱ्या बसेस मात्र आजही थेट जातात. काल ज्या जागेवर मृत्यूचे तांडव झाले, त्या ठिकाणापासून थोडे पुढे बस उभ्या राहत होत्या.