शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी, दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: February 27, 2017 00:01 IST

अकरा गुन्ह्यांची कबुली; दोन लाखांचा ऐवज जप्त; शहर पोलिसांची कारवाई

सातारा : शहर व परिसरात घरफोडी, पर्स चोरी, दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पर्दाफाश केला. या टोळीने तब्बल ११ गुन्ह्यांची कबुली दिली असून, दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे.राहुल पंडित सगट (वय २५), सागर रामा खुडे ऊर्फ वाकळ (२६, रा. प्रतापसिंहनगर, सातारा), सत्यम संजय मोरे (२१, रा. खावली, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे तिघे दुचाकीची चोरी करण्यासाठी विसावा नाका येथे येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला सतर्क केले. या पथकाने विसावा नाका येथे सापळा लावला. त्यावेळी तिघांनाही पकडण्यात आले. शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी अकरा गुन्ह्यांची कबुली दिली. शहरातील पाच मोबाईल शॉपी, सात घरफोड्या, तीन दुचाकी, एक पर्स चोरी अशा गुन्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.तीन दुचाकी, १४ मोबाईल अ‍ॅक्सेसरीज असा सुमारे दोन लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलिस त्यांच्याकडे कसून चौकशी करीत आहेत.या कारवाईमध्ये सहायक पोलिस निरीक्षक समाधान चवरे, सहायक फौजदार लियाकत शेख, हवालदार संतोष इष्टे, प्रवीण फडतरे, संतोष महामुनी, गणेश चवरे, नीलेश काटकर, नीलेश गायकवाड, प्रदीप मोहिते, पंकज ढाणे, सोमनाथ शिंदे, शिवाजी भिसे यांनी सहभाग घेतला.