शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’च्या कारभारामुळे गेला मुलाचा जीव

By admin | Updated: May 30, 2016 00:59 IST

पित्याचा आरोप : बिले दुरुस्तीसाठी घेऊन जाताना अपघात; आता तर कनेक्शनच केले बंद

सातारा : शासकीय कामातील दिरंगाई, मनमानीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो; पण बुध येथील कालेकर कुटुंबाला बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची मोठी किंमत मोजावी लागली. वारंवार येत असलेली दूरध्वनीची चुकीची बिले दुरुस्त करण्यासाठी पुसेगाव येथे हेलपाटे मारत असतानाच एक दिवस कालेकर यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. हे कमी काय म्हणून आता तर कालेकर यांचे कनेक्शनही बंद करण्यात आले आहे.बुध, ता. खटाव येथील प्रदीप कालेकर डोळ्यात पाणी आणून सांगत होते... जानेवारी महिन्यांपासून बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराने आमचं कुटुंब त्रस्त आहे. चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीसाठी माझ्या मुलांना वारंवार बुध-पुसेगाव असे हेलपाटे मारावे लागत होते. यातच मुलाचा जीव गेला. चूक एक-दोनदा होते; पण वारंवार चुका करून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप कालेकर यांनी केला. (प्रतिनिधी)आता बारावीच्या निकालाचा काय उपयोग?ओंकार दूरध्वनीचे बिल दुरुस्त करून आणण्यासाठी तो पुसेगावला गेला अन् काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बारावी परीक्षेत ओंकार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला; पण आपला निकाल पाहण्यासाठी ओंकार नव्हता. आता त्या निकालाचा काय उपयोग? बीएसएनएलच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला आमचा मुलगा गमवावा लागल्याचे दु:ख आणि संताप प्रदीप कालेकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.वारंवार येणारी दूरध्वनीची चुकीची बिले, कनेक्शन बंद करणे याबाबत बीएसएनएलच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात तक्रार केली. मात्र, करू, बघू अशी उत्तरे मिळाली. बिल भरले नाही म्हणून आता आमचे कनेक्शन कट केले आहे. आता पुन्हा हेलपाटे मारायचे का? दुसऱ्या मुलाचा जीव गेल्यानंतर बीएसएनएलचे डोके ठिकाणावर येणार आहे का?- प्रदीप कालेकर, बुध