शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

ब्रिटिशकालीन पुलाला ‘बांधकाम’ची मलमपट्टी!

By admin | Updated: November 11, 2015 23:48 IST

जुन्या कोयना पुलाला नव्याने रंगरंगोटी : १४६ वर्षांचे पुलाचे अवशेष; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दखल

कऱ्हाड : शंभरहून अधिक वर्षे पूर्ण झालेल्या व डागडुजीअभावी प्रत्येक परिस्थितीशी झुंज देत असलेल्या कऱ्हाड येथील कृष्णा- कोयना नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाची नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मलमपट्टी करण्यात आली आहे. १८७२ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या पुलाच्या संरक्षक दगडी कठड्यास रंगरंगोटी करण्यात आली असून, पुलावरील रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पुलाची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली तरी अद्यापही कोल्हापूर पुरातत्त्व विभागातर्फे कोणत्याही स्वरूपाची दखल घेण्यात आलेली नाही. ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी कोयना नदीवरील या ब्रिटिशकालीन पुलाच्या स्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. तसेच पुलाच्या सद्य:स्थितीबाबत माहितीही दिली होती. पुलाच्या संरक्षक कठड्यांची झालेली दुरवस्था गेलेला रंग, गंजलेले लोखंडी अवशेष तसेच परिसरातील दुर्गंधीबाबत सद्य:परिस्थिती मांडली असता, सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेने पुलाच्या परिस्थितीकडे लक्ष दिले आहे. तसेच पुलावरील रस्त्यावर पडलेलेल्या खड्ड्यावर खडी टाकण्यात आली आहे.पूर्वीच्या काळात पाटणला कऱ्हाडशी जोडणारा मार्ग म्हणून या कोयना नदीवरील पुलास ओळखले जात असे. या कोयना नदीवरील पुलाच्या बांधकामास जुलै १८५६ मध्ये सुरुवात करण्यात आली. लोखंडी तुळ्या अन् दगडांच्या साह्याने बांधकाम करण्यात आलेला हा पूल १ मे १८७२ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बांधण्यात आलेल्या एकूण आठ कमानींपैकी चार कमानी या दगडांच्या साह्याने बांधण्यात आल्या आहेत.१४६ वर्षे पूर्ण झालेल्या हा पूल त्या काळात वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने या पुलाशेजारी एक नवा उंच, रुंद व भक्कम पूल कोयना नदीवर १९ मे १९७४ साली बांधण्यात आला. त्यानंतर अलीकडे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या योजनेत या पुलाचेही विस्तारीकरण करण्यात आले. वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या जुन्या कोयना पुलाचा वापर हा पादचारी पथमार्ग म्हणून केला जात आहे. बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलास आता २०१५ मध्ये १४६ वर्षे पूर्ण झाले आहेत. नुकतेच या पुलाच्या दगडी बांधकाम असलेल्या कठड्यांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच पुलावरील रस्त्यांची डागडुजीही करण्यात आली आहे. पुलाच्या सुधारणेकडे शासनाने काही प्रमाणात लक्ष दिले असल्याने नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. पूर्वी या पुलाची दयनीय अवस्था झाली होती. नागरिकांकडून डागडुजीची मागणी होत होती. (प्रतिनिधी)पुलाखालील पायऱ्यांची स्वच्छताकृष्णा-कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलावरून शहरातील लोकांकडून दररोज मोठ्या प्रमाणात नदीपात्रात कचरा टाकला जातो. पुलावरून टाकण्यात आलेल्या कचऱ्यापैकी काही कचरा हा नदीपात्रात पडतो, तर काही पुलाखाली. पुलाखाली पडणाऱ्या कचऱ्यामुळे त्या ठिकाणी पायऱ्यांवर कचऱ्याचे ढीग साचते, त्यामुळे दुर्गंधी पसरते. या ठिकाणी साचत असलेला कचरा हा हटविल्याने परिसर स्वच्छ झाला आहे. पुलालगत दैत्यनिवारणी देवीचे मंदिर असल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.‘बांधकाम’ कडून डागडुजी पुरातत्त्व विभागाकडून कधी ?कृष्णा-कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या लोखंडी पुलाचे अवशेष कोल्हापूर येथील पुरातत्त्व विभागाने तपासणीसाठी नेले होते. वर्षपूर्ण होऊनही अद्याप कोणत्याही स्वरूपाची दखल पुरातत्त्व विभागाकडून घेण्यात आली नाही. मात्र, येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाच्या कठड्याची रंगरंगोटी व रस्त्याची डागडुजी केली गेली आहे. ब्रिटिशकालीन पुलाला रंगकामामुळे ‘झळाळी’कऱ्हाड येथे ब्रिटिशकालीन पुलाच्या संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. कठड्यावरील रंग गेला होता. तसेच कठड्यांची झीजही झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यावर सफासफाई करून रंगकाम केल्याने दगडी कठडे आकर्षक दिसू लागले आहेत. ब्रिटिशकालीन पूल हा कऱ्हाडमधील ऐतिहासिकच ठिकाण आहे. या पुलामुळे कऱ्हाडची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. इंग्रजांच्या काळात बांधण्यात आलेला हा पूल आजही चांगल्या अवस्थेत असल्याने त्याकाळातील तंत्रज्ञान कशाप्रकारचे असेल, हे या पुलावरून समजते.- विवेक ढापरे, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड