शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

सेतू कार्यालये ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

सातारा : आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन वेळ निश्चित करावी लागत आहे. त्यानंतर नागरिकांना जवळच्या ...

सातारा : आधारकार्ड अपडेट करण्यासाठी नागरिकांना महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन वेळ निश्चित करावी लागत आहे. त्यानंतर नागरिकांना जवळच्या ठिकाणी जाऊन आधारकार्ड अपडेट करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांना वेळ आणि पैसा विनाकारण वाया जात आहे. मात्र आता या सर्व सुविधा बंद असल्याने गैरसोय होत आहे.

००००००००

मंदिरांमध्ये काळजी

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्या वाढत असल्याने निर्बंध लादलेले आहेत. तरीही अनेक ठिकाणची मंदिरे उघडी आहेत. त्या ठिकाणी ठराविक दिवशी भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मंदिरात गर्दी करू नये, अशी मागणी केली जात आहे.

०००००००

कोरोनाचा पर्यटनाला फटका

महाबळेश्वर : यंदाच्या वर्षी उन्हाळ्याच्या हंगामात कोरोना असल्याने हौसी पर्यटकांना महाबळेश्वरला येता आले नव्हते. त्यामुळे सात महिने कोठेही फिरता आले नव्हते. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांनाही चांगला रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र कोरोनामुळे पर्यटनाला फटका बसत आहे.

००००००००

बसस्थानके ओस

कऱ्हाड : राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या बंद केल्या आहेत. त्यामुळे बसस्थानके ओस पडली आहेत. या ठिकाणी पर्यटक फिरकत नसल्याने त्याचा इतर व्यावसायिकांनाही फटका बसत आहे. ही मंडळी एसटी कधी सुरू होणार याच्या प्रतीक्षेत आहेत.

००००००००

कमी उंचीचे पूल धोक्याचे

औंध : औंध-खरशिंगे येथील पूल अनेक वेळा पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. तसेच उंची कमी असल्याने पावसाळ्यात लगेच पुलावरून पाणी वाहू लागते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून औंध-खरशिंगे रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारकांच्यातून होऊ लागली आहे. या रस्त्यावरून उसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

०००००००

शहरात मार्ग बदलला

सातारा : साताऱ्यात ग्रेड सेपरेटरचे काम सुरू केल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने कऱ्हाड, रहिमतपूर, कोरेगावकडून येणाऱ्या गाड्या पोवई नाक्याऐवजी जिल्हा परिषदेच्या पाठीमागून वळविल्या होत्या. आता ग्रेड सेपरेटरचे काम जोरात सुरू असल्याने या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत.

०००००००

बॅरिकेड धोकादायक

सातारा : सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर रस्ता दुभाजकात लोखंडी बॅरिकेड लावून अडथळे उभे केले आहेत. त्यातील अनेक बॅरिकेड हलले असून ते रस्त्यावर आले आहेत. जिल्हा क्रीडा संकुलाकडून पोवईनाक्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हे बॅरिकेड धोक्याचे ठरू शकते.

०००००००००

रस्त्यावर वाळूचे ढीग

सातारा : साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हा परिषद यादरम्यान असलेल्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर वाळू पडलेली आहे. ही वाळू अनेक दिवसांपासून उचलण्यात आलेली नाही. सुसाट दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वाळू हटविण्याची गरज आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण घटणार आहे.

०००००

डबक्यातील पाणी भागवतेय तहान

(फोटो सारांश)

पुसेसावळी : खटाव तालुक्यात मेंढीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून तो फायदेशीर ठरत आहे. पुसेसावळी परिसरात मेंढपाळ मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जातात. मात्र रस्त्यावरील डबक्यात साठलेल्या पाण्यावर मेंढ्यांना तहान भागवावी लागत आहे.

०००००००

गॅस दरवाढीने त्रस्त

शिरवळ : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून एक-एक रोजगार गेले आहेत. अनेकांचे पगार कमी झालेले आहेत. अशातच केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल व गॅसदरात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅसचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे, तर काहींचा पगार कमी करण्यात आला आहे. या परिस्थितीत चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत असताना गॅस तसेच इंधन दरवाढ झाल्याने सर्वसामान्य चिंतेत आहेत.