शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तरमांड’च्या भिंतीलगत दगडासाठी भगदाड

By admin | Updated: December 14, 2014 23:53 IST

ठेकेदाराचा प्रताप : धरणालगतच दगड फोडून दिवसाढवळ्या वाहतूक, अधिकाऱ्यांचे ‘कानावर हात’

चाफळ : गमेवाडी-चाफळ, ता. पाटण येथील उत्तरमांड धरणावर मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवून चक्क धरणाच्या भिंंतीजवळच उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाच्या भिंंतीला धोका निर्माण होत असून, महसूल विभाग याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त होत आहे. विभागातील शेतीला पाणी मिळावे व नापीक जमीन ओलिताखाली येऊन जमीन सुजलाम्-सुफलाम् व्हावी, यासाठी गमेवाडी येथे उत्तरमांड धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या धरणाची व्यवस्था कृष्णा खोरे विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. धरणामध्ये गेली अनेक वर्षांपासून पाण्याचा साठा करण्यात येत आहे. मात्र, आजही धरणाची सुरक्षा रामभरोसे आहे. धरणाच्या भिंंतीखाली सध्या एक ठेकेदार गौण खनिजाचे उत्खनन करत आहे. उत्खनन केलेले दगड धरणाजवळील रिकाम्या जागेत फोडून त्याची राजरोसपणे भरदिवसा वाहतूक करत आहे. या उत्खननामुळे धरणाच्या भिंंतीला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत महसूल खात्याच्या मंडल अधिकाऱ्यांशी संर्पक साधला असता, गौण खनिजाचा पंचनामा केल्याचे सांगण्यात आले. मात्र कारवाई काहीच केली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पंचनामा होऊनही जर कारवाई झाले नसेल, तर महसूल खात्याच्या कामाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. धरण व्यवस्थापन यापासून अनभिज्ञ असल्याचे समोर येत आहे. ठेकेदाराचे कर्मचारी याबाबत फुशारक्या मारत आहेत. ‘आमच्या साहेबांनी रॉयल्टी भरली आहे,’ असे ते छातीठोकपणे सांगत आहेत. मात्र, रॉयल्टी भरली असली तरी ती किती ब्रास गौण खनिजाची भरली आहे, व प्रत्यक्षात किती ब्रासचे उत्खनन केले गेले आहे, हा संशोधनाचा विषय आहे. धरणाच्या भिंतीजवळच भगदाड पाडले जात असताना याकडे एकही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी फिरकत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून दररोज शासनाच्या तिजोरीला हजारो रुपयांचा चुना लावला जात आहे. याबाबत तत्काळ कारवाई करण्यात येऊन उत्तरमांड धरणाच्या भिंतीला निर्माण होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे. (वर्ताहर)म्हणे ते महसूल विभागाचे कामधरण परिसरात धरणाच्या उभारणी काळातील शिल्लक गौण खनिजाची माहिती आम्ही महसूल खात्यास दिली होती. सध्या धरणाच्या भिंंतीजवळ सुरू असलेल्या गौण खनिजाच्या उत्खननाची परवानगी आम्ही दिलेली नाही. ते महसूल विभागाचे काम आहे.- व्ही. व्ही. मुंजाप्पा, अभियंता, धरण व्यवस्थापन