शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यातही घ्यावं लागतंय विकतचं पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:13 IST

दररोज ३६ हजार खर्च : शासनाच्या लोकसंख्येच्या चुकीच्या धोरणाचा वाठार स्टेशन ग्रामस्थांना फटका

आॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन (जि. सातारा), दि. २२ : वाठार स्टेशनला लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे १९८० मध्ये शिधापत्रिकेवरील माणसी पंधरा लिटर पाणी शासनाकडून दिले जात होते. आत्ता या शिधापत्रिका गेल्या असल्या तरी परिस्थिती आहे तशीच आहे. शासनाच्या लोकसंख्या निकषामुळे गावाला दररोज ३६ हजाराचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. या गावाने सहा महिन्यांत पाण्यासाठी तब्बल १२ लाख रुपये खर्च केले.

वाठार स्टेशनची लोकसंख्या ५ हजार ८००. याप्रमाणे शासनाकडून गावाला दररोज १ लाख लिटर पाणी उपलब्ध होते. परंतु प्रत्यक्षात व्यापार, शिक्षणानिमित्त व बाहेरील गावातून या ठिकाणी वास्तव्य करत असलेले तसेच दैनंदिन कामासाठी येणाऱ्या लोकांची संख्या गावच्या लोकसंख्येच्या तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा पाणीप्रश्न ग्रामपंचायतीला सोडवावा लागत आहे. वाठार स्टेशनला तरंगत्या लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे दररोज ४ लाख लिटर पाण्याची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात १ लाख लिटरच पाणी मिळत असल्याने हे पाणी तब्बल १८ दिवसांनंतर या ग्रामस्थांना रोटेशननुसार मिळत आहे.

वाठार स्टेशनसाठी असलेल्या जलस्वराज्य प्रकल्पातील विहिरीत पाणीच नसल्याने ही योजना पूर्ण बंद आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार गावाला कोणताही हक्काचा ओढा, पाझर तलाव नाही. गावासाठी असलेल्या बारा हातपंपांपैकी जवळपास सहा हातपंप बंद अवस्थेत आहेत. सध्या सुरू असलेले सहा हातपंपही अखेरचीच घटका मोजत आहेत. त्यामुळे तीन हजार पाचशे लिटर क्षमतेचे पंधरा खासगी पाणी टँकर गावाची तहान भागवत आहेत. यासाठी ग्रामपंचायत दररोज सुमारे ३२ हजारांचा खर्च ग्रामस्थांवर करत आहे.

वाठार स्टेशन आणि खासगी टँकर हे समीकरणच बनले आहे. कित्येक वर्षांपासून गावाला हक्काच पाणी देण्यात कोणलाच यश आले नाही. वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न सोडवण्याचे काम विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरू आहे. ही पाणी योजना प्रत्यक्षात सुरू झाली तर विकास दुप्पट वेगाने होईल, अशी आशा ग्रामस्थांना आहे. सध्याच्या परिस्थितीतून ग्रामस्थांना शासनाने आधार देऊन गावच्या तरंगत्या लोकसंख्येनुसार पाणी उपलब्ध करून देण्याची भूमिका पार पाडावी व पाणी संकटातून ग्रामस्थांची सुटका करावी, अशीच मागणी होत आहेत.

वाठार स्टेशनमध्ये पाण्याची भीषण टंचाई आहे. यासाठी नव्याने पाणी योजनेचे काम हाती घेतले आहे. वाठार स्टेशन लवकरच टॅकरमुक्त होईल. - महेश लोंढे, सरपंच, वाठार स्टेशन