शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भिवडीत तलवार हल्ला; वृद्ध गंभीररीत्या जखमी

By admin | Updated: May 1, 2016 00:15 IST

सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

कोरेगाव : भिवडी (पुनर्वसीत), ता. कोरेगाव येथे जागेच्या वादातून पाच जणांनी उत्तम रामचंद्र शेलार (वय ६३) यांच्यावर तलवार आणि लोखंडी गजाने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तम शेलार हे पाहुण्यांची लग्नपत्रिका राजेंद्र आनंदराव शेलार यांच्या घरी देण्यासाठी गेले होते. तेथून घरी परत जाण्यासाठी चालले असताना कारमधून संतोष सहदेव शेलार, गणेश प्रकाश शेलार, विलास पार्टे, गणेश नामदेव सणस व गणेश सहदेव शेलार हे उतरले. त्यांनी हातात तलवार घेऊन ‘तुला आता खल्लास करतो,’ म्हणत उत्तम शेलार यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. त्यानंतर ते पळत सुटले, त्याचवेळी पाठीमागून लोखंडी गज फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यांनी आरडाओरडा केल्याने त्यांची पत्नी यमुना व भावजय शोभा शंकर शेलार या मदतीसाठी आल्या, त्यांना देखील या युवकांनी मारहाण केली. उत्तम शेलार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचारार्थ सातारा येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी गणेश प्रकाश शेलार, गणेश नामदेव सणस व गणेश सहदेव शेलार यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने दि. ३ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हवालदार अनंत गोसावी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)