शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा मृत्यू

By admin | Updated: April 13, 2017 14:04 IST

नांदगावातील दुर्घटना : नांगरट सुरू असताना ताबा सुटला

आॅनलाईन लोकमतकऱ्हाड (सातारा), दि. १३ : शेतात नांगरट सुरू असताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळून युवकाचा जागीच मृत्यू झाला. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील डोकरमाळ नावच्या शिवारात बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही दुदैर्वी घटना घडली. पंकज पांडुरंग पाटील (वय २५) असे त्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील पंकज पाटील या युवकाची डोकरमाळ नावच्या शिवारात शेतजमीन आहे. या जमिनीत सध्या मशागतीचे काम सुरू होते. मशागतीच्या कामासाठी पंकजने त्याच्या मावशीचा ट्रॅक्टर आणला होता. या ट्रॅक्टरद्वारे पंकज स्वत:च्या तसेच परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीची कामे करून देत होता. बुधवारी रात्री तो डोकरमाळ शिवारात चुलत्यांच्या शेतजमिनीत नांगरट करण्यासाठी गेला होता. डोकरमाळ हे शिवार डोंगर पायथ्याला आहे. पंकज ज्या शेतात नांगरटीसाठी गेला होता त्या शेतालगत सुमारे पन्नास फूट खोल विहीर असून, संबंधित विहिरीला पाणी नाही. त्यामुळे ती विहीर मुजविण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला होता. मशागतीचे काम संपल्यानंतर विहीर मुजविली जाणार होती. पंकज एकटाच त्या शिवारात नांगरट करीत होता. नांगरट करीत तो विहिरीजवळ गेला. त्यावेळी ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. त्यामध्ये पंकजचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. रात्री उशिरा घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह विहिरीबाहेर काढला. अपघाताची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे.