शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

झाडाला दुचाकी धडकून मुलगा ठार

By admin | Updated: May 14, 2016 23:45 IST

एकाच गाडीवर चौघांचा प्रवास : अंगापूरजवळील अपघातात अन्य तिघे जखमी

अंगापूर : भरधाव दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याकडेच्या झाडाला धडकली. या अपघातात सात वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला असून, तिघेजण जखमी आहेत. हा अपघात अंगापूर फाटा ते अंगापूर या मार्गावर शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास झाला. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगेश धनाजी ठोंबरे (वय ७) असे ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ११ बीवाय ७००३ दुचाकीवरून चौघेजण शनिवारी दुपारी कोरेगाव येथून बाजार करून अंगापूरला येत होते. नीलेश जाधव (वय ३५, रा. अंगापूर) हे गाडी चालवत होते. त्यांची दुचाकी अंगापूर रस्त्यावरील मठाजवळ आली असता गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी रस्त्याकडेच्या लिंबाच्या झाडाला जाऊन धडकली. यावेळी गाडीच्या टाकीवर बसलेला मंगेश धनाजी ठोंबरे याचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार नीलेश जाधव व श्रेयस दत्तात्रय कोळपे (३), विलास भोकरे हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी तत्काळ १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून जखमींना साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या अपघाताची सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. आजोबा-नातू जखमी अपघातात ठार झालेला व जखमी सर्वजण मूळचे लोणंदचे असून, ते कुटुंबीयांसमवेत अंगापूरला मेंढ्या घेऊन आले होते. बाजारासाठी ते कोरेगावला गेले होते. तेथून अंगापूरला परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी विलास भोकरे व त्यांच्या मुलीचा मुलगा नातू श्रेयस कोळपे हे दोघेही जखमी झाले आहेत.