शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या प्रमाणपत्रासाठी चढाओढ

By admin | Updated: July 27, 2014 23:07 IST

टीकाटिप्पणीची ‘अतिवृष्टी’ : कोण पास-कोण नापास, ठरवणार मात्र मतदार

पाटण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगमनगर पुलाचे भूमिपूजन केले. त्या कार्यक्रमात ‘तुम्ही चांगले काम करताय’ अशी प्रशंसा पाटणकरांनी उपमुख्यमंत्र्यांची केली, अशी टीका करून शंभूराज देसाई यांनी चांगल्या कामाचे प्रमाणपत्र जनता देते, असे सुनावले तर शेडगेवाडी व गणेशवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये सध्या चढाओढ सुरू असून, कोण पास आणि कोण नापास याचा फैसला येत्या दोन महिन्यांतच पाटणची जनता करणार आहे. तोपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या नेत्यांच्या दररोजच्या कार्यक्रमामुळे प्रमाणपत्र देणाऱ्या जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे.पाटण तालुक्यातील जनता समाधानी आहे का, हलाखीचे जीवन जगत आहे, हे नुकत्याच चार दिवस झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे उघड झाले. रस्त्यावरील गावे किमान सकाळी उठल्यावर विजेच्या प्रकाशात दुधाचा वाफाळलेला चहा, कडक इस्त्रीचे कपडे, ताजी चपाती, वेगवेगळ्या भाज्या, फिल्टरचे पाणी आणि दारात येणाऱ्या गाडीमुळे समाधानी आहेत. मात्र, पाटण तालुक्याच्या दुर्गम भागात डोंगरावर वसलेली शेकडो गावे अती पावसामुळे गावात वीज नसल्याने अर्धपोटी राहतात; कारण गावात वीज नसल्यामुळे दळण मिळत नाही. ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. घरात गळत असल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारी पडलेल्या व्यक्ती, लहान मूल, गरोदर मातांना पाटण, मोरगिरी, कोयनानगर किंवा ढेबेवाडीला न्यायचे झाल्यास अंधारातून चारचौघांनी डोलीतून घेऊन जायचे किंवा एखादी मोडकीतोडकी जीप बघून ४० किलोमीटर अंतर कापायचे. वाटेतच जर काही बरं वाईट झाले तर पेशंट जीवाला मुकले. अशा घटना आजही तालुक्यात घडत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेला पडला आहे. (प्रतिनिधी)