शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कास तलावाजवळ आता बाटल्या,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पेट्री : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पेट्री : सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या व प्लास्टिक कचऱ्याचा ढीग साचला आहे. एवढेच नव्ह तर या कचऱ्यात फेकून दिलेल्या मास्कचाही समावेश झाला आहे. घाणीमुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून, निसर्गप्रेमींमधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. तरीही अनेक तरूण व नागरिक कास पठार व तलाव परिसरात भटकंतीसाठी येत असतात. काही हुल्लडबाज तरुणांकडून तलावाच्या परिसरात पार्ट्या केल्या जातात. तसेच दारूच्या रिकाम्या बाटल्या, पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, वापरलेले मास्क तलावाच्या आवारात फेकून दिले जातात. त्यामुळे जैवविविधतेने नटलेल्या या परिसरातील पर्यावरणाला बाधा पोहोचत आहे.

कास तलाव परिसरात दिवसेंदिवस कचऱ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. अविवेकीपणामुळे या पर्यटनस्थळांचे निसर्गसौंदर्य हरवून बसण्याची चिंता निसर्गप्रेमी व्यक्त करत आहेत. या पर्यटनस्थळांचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी प्रत्येकाने आपली मानसिकता बदलून स्वच्छता कशी राहील, यासाठी प्रयत्नशील असायला हवे. मात्र, असे होताना दिसत नाही. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पर्यटनस्थळांवर बंदी असताना बहुसंख्य नागरिक पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. कास तलावात जलविहार करणे, तेलकट भांडी साबण अथवा डिटर्जंटने धुणे, यामुळे पाणी दूषित होण्याचा धोका असून, जलचरांनादेखील धोका उद्भवू शकतो.

(चौकट)

स्वच्छता राखणे गरजेचे...

कास तलाव परिसरात राजरोसपणे पार्ट्या झोडल्या जात आहेत. या परिसरात कचरा होणार नाही, याची खबरदारी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा येथील शुध्द, निर्मळ वातावरण तसेच गर्द झाडीतील सौंदर्याचा आनंद आपण हरवून बसू. कास तलावाच्या परिसरात पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी, सामाजिक संस्था, विद्यार्थी यांच्यासह अनेकांनी स्वच्छता मोहीम राबवली आहे. मात्र, हुल्लडबाज पर्यटकांना याचे तसूभरही गांभीर्य नाही.

फोटो : १० सागर चव्हाण

कास तलाव परिसरात अशाप्रकारे बाटल्यांचा खच पडला आहे. (छाया : सागर चव्हाण)