शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यातील घोट सोसायटीचे दोन्ही ठराव अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पाटण तालुक्यातील घोट विकास सेवा सोसायटीतून दोन ठराव आल्याने ते दोन्ही ठराव विभागीय ...

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पाटण तालुक्यातील घोट विकास सेवा सोसायटीतून दोन ठराव आल्याने ते दोन्ही ठराव विभागीय सहनिबंधक यांनी रद्द ठरवले आहेत. तसेच दाखल झालेल्या ४६ हरकतींपैकी १४ हरकती फेटाळून लावल्या आहेत.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदारयादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये १९६३ मतदारांची कच्ची यादी जिल्हा बॅंकेने तयार करून ती सहनिबंधक कार्यालयास पाठवली होती. ही यादी प्रसिद्ध करून त्यावर आक्षेप व हरकती मागविल्या होत्या. कच्च्या यादीवर ४६ हरकती दाखल झाल्या होत्या. यामध्ये सर्वांचे लक्ष वेधले, ते पाणीपुरवठा संस्थेतील खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्या नावाचे ठराव जिल्हा बॅंकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता. सहनिबंधकांनी हे दोन्ही ठराव पात्र ठरवत मतदारयादीत समाविष्ट केले आहेत.

दरम्यान, बुधवारी दाखल झालेल्या हरकतींबाबत विभागीय सहनिबंधक निकाल जाहीर करणार होते. त्यानुसार आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे पाणीपुरवठा मतदारसंघांमधील केलेले ठराव मान्य करून त्यांची नावे मतदार यादीमध्ये वाढवण्यात आली आहेत. या मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. बँकेने अधिकार नसताना गोरे व निंबाळकर या दोघांची नावे वगळली होती, याबाबत घेतलेली हरकत विभागीय सहनिबंधक यांनी मान्य केली आहे.

पाटण तालुक्यातील घोट विकास सेवा सोसायटीमधून मधुकर बंडू आरेकर आणि लक्ष्मण किसन बोरगे या दोघांचे ठराव संचालकांच्या सहीने तयार झाले होते. हे दोन्ही ठराव दुबार असल्याने ते विभागीय सहनिबंधक यांनी रद्द केले. या दोघांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. तसेच कऱ्हाड तालुक्यातील प्रियदर्शनी विकास सेवा सोसायटीमधील दुबार ठरावापैकी एक ठराव कायम ठेवण्यात आला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी श्री संत सावतामाळी पाणीपुरवठा संस्था, माण व माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी गोरखनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था, वरकुटे-मलवडी येथून ठराव दाखल केला होता. यांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी करण्यात आलेले ठराव पात्र ठरविण्याचा निर्णय विभागीय सहनिबंधक यांनी घेतला.

कच्च्या मतदार यादीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांचे पाणी पुरवठा मतदारसंघातील ठराव जिल्हा बँकेने अपात्र यादीत टाकले होते. त्यावरून या दोघांनी विभागीय सहनिबंधकांकडे हरकत दाखल केली होती. तसेच विभागीय सहनिबंधक यांच्या निकालानंतर उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार जयकुमार गोरे यांनी दिला होता. दरम्यान, यादीतील नावे अपात्र ठरल्यानंतर सुनावणीवेळी दोघांनीही हरकती नोंदवल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन मंगळवारी विभागीय सहनिबंधकांनी या दोघांचेही ठराव पात्र ठरविले.

२७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी

विभागीय सहनिबंधक यांनी दाखल झालेल्या ४६ हरकतींपैकी १४ फेटाळल्या; मात्र ३२ हरकती मान्य केल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने १९६३ इतक्या मतदारांची यादी विभागीय सहनिबंधकांकडे सादर केली होती. यामधील दोन मतदार संख्या वाढणार असून, एक मतदार संख्या कमी होणार आहे. त्यामुळे १९६४ मतदारांची अंतिम यादी आता २७ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.