शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

सातारा बसस्थानकातील दोन्ही गेट खुले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2016 23:43 IST

घेतला मोकळा श्वास : रस्त्यावरील गाड्यांची संख्या कमी झाल्याने वाहतूकही झाली सुसह्य-लोकमतचा दणका

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकाजवळील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे चार दिवसांपासून बदल केला होता. यामध्ये मध्यवर्ती बसस्थानकाचे सर्व गेट बंद करून आत व बाहेर जाण्यासाठी केवळ एकच गेट सुरू ठेवले होते. त्यामुळे वाहनांच्या बसस्थानकात व बाहेर लांबच लांब एसटीच्या रांगा लागत होत्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर एसटी व्यवस्थापनाने बदल करून आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट सुरू केले होते. त्यामुळे बसस्थानकासह समोरील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. पुणे-कोल्हापूर मार्गावरील सातारा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच बारामती, फलटण, अहमदनगर, बीड, सोलापूर, बार्शी या भागात जाण्यासाठी सातारा हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने राज्यातील सर्वच मोठ्या बसस्थानकातून सुरू असलेल्या गाड्या सातारा मार्गेच जातात. त्यामुळे बसस्थानकात दररोज सरासरी अठरा गाड्या ये-जा करत आहेत. या गाड्यांचा बसस्थानकावर ताण पडत होता. तसेच पोवई नाक्याकडून येणाऱ्या गाड्या सुसाट असल्या, तरी बसस्थानकासमोर आल्यानंतर वाहतुकीला ब्रेक लागत होता. लांब एसटी गाड्यांना वळण बसत नसल्याने वाहतूक विस्कळीत होते. यावर उपाय करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळ, सातारा पोलिसांची वाहतूक शाखेने एकत्रित निर्णय घेऊन वाहतुकीत बदल केला होता. हा बदल चांगल्या हेतूने केला असला, तरी तो एसटी महामंडळातील कर्मचारी व चालक-वाहकांच्या पचनी पडला नव्हता. लांबून वळसा घालून नेण्याचा नियम जाचक वाटू लागला होता. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा करून आपापसात चर्चा करून नाराजी व्यक्त केली जात होती.यासंदर्भात काही चालक-वाहकांनी ‘लोकमत’शी बोलतानाही नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच मंगळवारी व्यवस्थापनाने दखल घेऊन दोन्ही गेट सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंगळवारी दुपारनंतर वाहतूक सुरळीत झाल्याचे पाहायला मिळत होते. (प्रतिनिधी)मध्यवर्ती इमारतीकडचा दरवाजा विरलासातारा बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या मध्यवर्ती शासकीय इमारतीकडून पोवई नाक्याला येत होत्या. लांब गाड्यांचे वळण बसत नसल्याने वाहतूक विस्कळीत होत होती. त्यामुळे सातारा बसस्थानकाला तटभिंत फोडून मध्यवर्ती प्र्रशासकीय इमारतीकडे ‘आऊट गेट’ सुरू करावे, असा पर्याय सुचविला जात होता. यासंदर्भात तत्कालीन विभाग नियंत्रक अनंत मुंडीवाले यांनी सकारात्मकता दाखविली होती. मात्र, त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. त्यामुळे पूर्वेला दरवाजा केल्यास पोवई नाका ते स्टेडियम मार्गावरील वाहतुकीला ब्रेक बसणार नाही आणि वाहतूक सुरळीत होईल, असे सांगितले जात आहे.सातारा-स्वारगेट ही बस स्वारगेट बसस्थानकातून नेऊन संतोष माने या चालकाने सर्वांनाच हादरून सोडले होते. या प्रकरणातून धडा घेऊन सातारा बसस्थानकात ‘आऊट गेट’ला एक केबीन बनविली होती. त्याठिकाणी बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या गाड्यांची नोंद करूनच त्या सोडल्या जात होत्या. ही केबीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्या ठिकाणचा कर्मचारीही तेथे बसत नाही. त्यामुळे पूर्वीची पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी चालकांमधून केली जात आहे.पादचारी, बसचालकांची सुरक्षितता व वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने सातारा पोलिसांची वाहतूक शाखा, एसटी महामंडळाने वाहतुकीत बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, केवळ एकच प्रवेशद्वार खुले ठेवणे संयुक्तीक नव्हते.- मधुकर शेंबडे, वाहतूक मित्र.