शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वसना नदीवर २७ ठिकाणी बंधारे

By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST

दुष्काळी भागाला दिलासा : पुनरुज्जीवनाचे काम प्रगतीपथावर

वाठार स्टेशन : वसना नदी पुनरुज्जीवनाचे काम सध्या प्रगतिपथावर असून, सोळशी ते पळशी दरम्यान बंधाऱ्यांची कामे वेगात सुरू आहेत. त्यामुळे दुष्काळी उत्तर कोरेगावच्या शेती व पिण्याचा पाणी प्रश्न मार्गी लागून जनतेला दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या नदीवर २७ ठिकाणी बंधारे बांधण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, अर्चना वाघमळे यांनी कामांची पाहणी केली. कामांचा दर्जा व गुणवत्ता याची सविस्तरपणे माहिती घेत त्यांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ठेकेदार व ग्रामस्थांना महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी भाजपचे दीपक पिसाळ, सुरेश निकम, संभाजी लेंभे, प्रमोद कदम, संजय साळुखे, प्रमोद खराडे, सदानाना साळुंखे, विद्याधर धुमाळ, रवींद्र जगताप, दादा देशमुख आदी उपस्थित होते. वसना नदी पुनरुज्जीवन या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीने पाठपुरावा केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी १२.१५ कोटींचा निधी दिला. त्यापैकी ६.१२ कोटी मार्चअखेर खर्च करावयाचे असल्याने बंधाऱ्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामध्ये दहिगाव, घिगेवाडी, पिंपोडे, सोनके, नांदवळ, नायगाव व सोळशी येथील बंधारे समाविष्ट आहेत. (वार्ताहर) तीन कामे पूर्ण होणार...जलसंपदा विभागाच्या कण्हेर विकास विभागाच्या नियंत्रणाखाली होत असलेली ही कामे येणाऱ्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होतील, असा विश्वास नितीन पाटील यांनी व्यक्त केला. तसेच बंधाऱ्यांच्या या कामांमुळे भूजल पातळीत वाढ होऊन पाणी जादा दिवस टिकून राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील वसना नदीकाठच्या अनेक गावांचा पाणीप्रश्न संपणार आहे. या नदीवर सध्या २७ मोठे बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. - दीपक पिसाळ, पिंपोडे बुद्रुक