शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

हायवेवर विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह

By admin | Updated: June 12, 2016 00:43 IST

वाढेफाटा : अत्याचार करून खून केल्याची शक्यता; दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या पुरुष मृतदेहाशी धागेदोरे शोधण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू

सातारा : म्हसवे गावच्या हद्दीत बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असतानाच वाढे फाट्यापासून जवळच एका हॉटेलच्या शेजारील सर्व्हिस रस्त्यावरील नाल्यात शनिवारी दुपारी २५ ते ३० वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही मृतदेह पाचशे मीटरच्या अंतरावर सापडल्याने हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या महिलेचा अत्याचार करून खून केला असावा, अशी पोलिसांना शंका आहे. वाढेफाट्यापासून दोनशे मीटर अंतरावर एक हॉटेल आहे. या हॉटेलशेजारी असणाऱ्या झाडीतील नाल्यात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी बारा वाजता सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह त्यांची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांच्यासोबत महिला कर्मचारीही होत्या. संबंधित महिलेचा झाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पूर्णपणे विवस्त्र अवस्थेत असल्यामुळे तिच्या अंगावर चादर टाकण्यात आली. महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेहावर कोठे जखमा आहेत का, हे पाहिले. मात्र जखमा कोठेच आढळल्या नाहीत. त्यामुळे हा गळा आवळून खून असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी या घटनास्थळपासून केवळ पाचशे मीटर अंतरावर एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या महिलेचा आणि त्या पुरुषाचा काही संबंध आहे का, याचे धागेदोरे शोधण्याचे प्रयत्न पोलिसांनी तत्काळ सुरू केले. सध्या या महिलेचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतरच अत्याचार झाला की नाही, नेमका मृत्यू कशामुळे झाला, याचा उलघडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या तरी या घटनेची आकस्मात मृत्यू अशी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. श्वान जागीच घुटमळले ! झाडीमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानालाही पाचारण केले. संबंधित महिला विवस्त्र असल्यामुळे तिचे कपडे नेमके कोठे आहेत, हे शोधण्याचा श्वानाने प्रयत्न केला. मात्र श्वान घटनास्थळीच घुटमळले. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. परंतु कसलेही धागेदोरे सापडले नाहीत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची गडचिरोलीला बदली झाल्याने त्यांचा पदभार अतिरिक्त पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्याकडे आहे. कलासागर यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. बघ्यांच्या गर्दीने तपासात अडथळे ! महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी दुपारी बारा वाजता वाढे फाटा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. काहीवेळातच परिसरातील बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. आजूबाजूने बघ्यांनी गर्दी केल्यामुळे श्वानही पुढे-मागे करत होते. अखेर पोलिसांना बघ्यांवर दंडुका उगारावा लागला. त्यानंतरच बघ्यांनी धूम ठोकली. महिलेला अनेकांनी पाहिले होते ! गेल्या चार दिवसांपूर्वी संबंधित महिलेला वाढे फाटा परिसरात फिरताना अनेकांनी पाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा लोकांकडूनच ओळख पटविण्याच्या अनुषंगाने माहिती मिळू शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)