शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बोधेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी एकमताने ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले. त्यानंतर सर्व सदस्यांनी ...

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील बोधेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी एकमताने ग्रामपंचायत सदस्य निवडून दिले. त्यानंतर सर्व सदस्यांनी बहुमताने सरपंच व उपसरपंच यांचीही निवड केली. गावातील ग्रामस्थांनी, गावात एकी राहावी तसेच गाव सुखी राहावे यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा पायंडा सुरू केला.

बोधेवाडी गावातही पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस पाहायला मिळायची. या निवडणुकीत भाऊबंदकी उफाळून मोठमोठे वाद होत होते. या सर्व वादांमुळे गावाचा विकास देखील खुंटला होता. हा सर्व प्रकार गावातील तरुण व समजूतदार ग्रामस्थांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकत्र बसून गावाच्या विकासासाठी तसेच वाद-विवाद टाळण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.

गावातील प्रत्येक समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्वाची संधी दिल्याने स्पर्धा, हेवेदावे झाले नाहीत. यंदाच्या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या पाच जागांसाठी केवळ पाचच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर सरपंचपदी नारायण बोधे व उपसरपंचपदी सूर्यकांत माने यांची निवड झाली.

निवड झालेल्या सरपंच, उपसरपंचांचा सत्कार उषा साळुंखे, कल्याणी बोधे, मालन सस्ते, रुक्मिणी माने यांनी केला. यावेळी प्रशांत बोधे, अमोल बोधे, अमित बोधे, जितेश बोधे, चंद्रशेखऱ माने व ग्रामस्थ उपस्थित होते.