सातारा : उसने पैसे दिले नसल्याच्या कारणावरून एकाला डोक्यात दगड मारून रक्तबंबाळ करण्यात आले. ही घटना साताऱ्यात घडली असून याप्रकरणी एका तरुणावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, याबाबत दीपक पोपट सुतार (वय २७, रा. माची पेठ, सातारा) याने तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १ एप्रिल रोजी साताऱ्यातील माची पेठेत मारहाण करण्यात आली. उसने ५०० रुपये दिले नाहीत म्हणून मला चिडून मारहाण झाली. तसेच डोक्यात दगड घालून रक्तबंबाळ करण्यात आले. या तक्रारीवरून पोलिसांनी अशोक कोंडिबा खरात (रा. माची पेठ, सातारा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक फौजदार जगदाळे हे तपास करीत आहेत.