शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कलेढोण शिवारात महिलेचा खून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 01:09 IST

लाखाचे दागिने लंपास : अज्ञात व्यक्तीकडून डोक्यात कुऱ्हाडीने वार

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथे शेतात गाय चारणाऱ्या एका शेतकरी महिलेवर अज्ञात व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करून तिला जागीच ठार केले. त्यानंतर तिचे मंगळसूत्र, कर्णफुले अन् पैंजण असे जवळपास एक लाख रुपयांचे दागिनेही लंपास केले. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळ व पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कलेढोण येथील शकुंतला बबन कणसे (वय ४७) या बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास गावालगतच्या शेतात नेहमीप्रमाणे गाय व वासरू चारायला घेऊन गेल्या होत्या, तर त्यांचे पती गाडी दुरुस्तीसाठी मायणीला गेले होते. संध्याकाळी घरी आल्यानंतर आपली पत्नी दिसली नाही म्हणून ते शेतात गेले. त्यावेळी पत्र्याच्या शेडजवळील झाडाखाली पत्नीचा रक्ताळलेला मृतदेह त्यांना आढळून आला. ही घटना समजताच गावकऱ्यांनीही तातडीने पोलिसांना बोलावून घेतले. झाडाखाली विश्रांती घेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला असावा व त्यानंतर मंगळसूत्र, कर्णफुले अन् पैंजण, आदी सोन्या-चांदीचा ऐवज लंपास केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. शकुंतला यांची दोन मुले गलाई व्यवसायानिमित्त कर्नाटकमध्ये आहेत. तर शेताची कामे दोघे पती-पत्नी करतात. अधिक तपास पोलिस अधिकारी प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल संजय देवकुळे करीत आहेत. (वार्ताहर) रक्ताळलेली कुऱ्हाड विहिरीत ! गावापासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावरच कणसे यांचे शेत असून, दुपारी या परिसरात नेमका कोणा-कोणाचा वावर होता, याचाही पोलिस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, गुन्ह्यात वापरण्यात आलेली रक्ताळलेली कुऱ्हाड गावाच्या रस्त्यालगत असलेल्या ३०० फूट अंतरावरील विहिरीत सापडली.