शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

कामथीच्या तरुणाचा पाटणमध्ये खून

By admin | Updated: December 24, 2014 00:22 IST

अल्पवयीन मुलगा ताब्यात : पुसेगावहून परतलेल्या दिंडीतील मारामारीत चाकूचा वार

पाटण : सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बाचाबाची झाल्यानंतर कामथी (ता. खटाव) येथील तरुणाचा सोमवारी रात्री चाकूने भोसकून खून करण्यात आला. पाटण पंचायत समितीच्या कार्यालयानजीक दिंडीत झालेल्या या खुनासंदर्भात सिद्धार्थनगर (पाटण) येथील एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशाल मारुती भिसे (वय १९, रा. निमसोड, ता. खटाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुसेगाव येथील यात्रेत विशाल भिसे व संबंधित अल्पवयीन मुलाची मोबाइलमधील संभाषण डिलीट करण्यासंदर्भात बाचाबाची झाली होती. त्यावेळी त्या मुलाने विशाल भिसेला ‘तुला बघून घेतो,’ अशी धमकी दिली होती. पुसेगावमधून परत निघालेल्या दिंडीतून दोघेही इतरांसमवेत पाटणला आले.दरम्यान, पंचायत समितीनजीक सोमवारी रात्री आठच्या सुमारास दिंडीतील काठीचा धक्का लागल्याच्या कारणावरून विशाल व संबंधित अल्पवयीन मुलाची जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत विशालच्या पोटात उजव्या बाजूला चाकू भोसकण्यात आला.त्यानंतर विशालला त्याच्या नातेवाइकांनी तातडीने पाटण ग्रामीण रुग्णालयात हलविले. विशालची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे रात्री दोन वाजता त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयातून पाटण पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. कऱ्हाड येथे शवविच्छेदन झाल्यानंतर विशाल भिसे याचा मृतदेह निमसोडला (ता. खटाव) पाठविण्यात आला. अल्पवयीन मुलास पोलिसांनी सातारा येथील बाल न्यायालयात हजर केले. (प्रतिनिधी)आजोळी आला आणि घात झालाविशाल भिसे पुनर्वसित कामथी (ता. खटाव) येथील रहिवासी. ज्ञानसाधना महाविद्यालयात तो एफवाय बीएस.सी या वर्गात शिकत होता. त्याचे आईवडील मुंबईला राहतात. विशाल एकुलता एक असून, त्याला एक बहीण आहे. दरवर्षी तो पुसेगावला दिंडीतून जात असे. खुनाच्या एक दिवस आधीच ‘मी उद्या येतोय,’ असा फोन त्याने त्याच्या आजोबांना केला होता; मात्र दिंडीसोबत तो आपल्या आजोळी गेला आणि त्याचा घात झाला. दरम्यान, आरोपी त्याचा नातेवाईकच असल्याचीही माहिती मिळाली आहे.