शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टिहीन शिल्पानं रुग्णांना केलं व्याधीमुक्त!

By admin | Updated: June 27, 2016 00:39 IST

जपलं जिव्हाळ्याचं नातं : उच्च पदावर पोहोचण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी

प्रशांत कोळी--  सातारा असंख्य संकटांवर मात करत, जीवनात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची धमक फक्त चांगली व्यक्तीच करु शकते असे नाही, तर काही व्यक्ती अशा आहेत की, त्यांना जीवनात मोठं बनायचं आहे, दुसऱ्यांचं आधार बनायचं आहे... आज अशाच एका ‘विशेष’ व्यक्तीचा घेतलेला हा अल्पसा परिचय... शिल्पा यशवंत बागल. ३२ वर्षीय युवतीचं हे नाव. ती मूळची सातारा तालुक्यातील लिंब गोवे येथील. ती सध्या सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात आयुर्वेदिक विभागात पंचकर्म विभागात सहायक पदावर कार्यरत आहे. शिल्पा जन्मताच ७५ टक्के अंध असून, तिने शिक्षणाच्या जोरावर अनेक संकटे लिलया पेलली आहेत. तिचा हा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. शिल्पा बागल हिचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण मुंबई झाले. दहावीनंतर तिने सहा महिन्यांचा टेलिफोन आॅपरेटिंगचा कोर्स वरळी (मुंबई) येथील विद्यालयात केला. दहावी-बारावीचे शिक्षण अंधेरी येथे पूर्ण केले. ‘द नॅशनल असोसिएशन आॅॅफ ब्लाइंड’ या संस्थेकडून शिक्षणासाठी सर्व सोयी मिळत असे. पुढे येथीलच लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातून पदवी अन् समाजशास्त्र तसेच भौतिक उपचारपद्धती यामध्ये डिप्लोमा कोर्स केला.सध्या जिल्हा रुग्णालयात ती आयुर्वेदिक विभागात पंचकर्म विभागात सहायक पदावर काम करत आहे. भौतिक उपचारपद्धतीत संधीवाताच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्याचे तिचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. शिल्पा बागल हिला साताऱ्यात नोकरीची पहिली संधी गिरिजा हॉस्पिटलचे न्यूरो सर्जन सुनील यादव यांनी दिली. याठिकाणी शिल्पाने आपल्या वेगळ्या कामाची छाप उमटविली. शिल्पा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारीही करत आहे. शिल्पा हिला स्पर्धा परीक्षेसाठी ‘रायटर’ची गरज भासते.शिल्पा बागल ही एकुलती एक. कुटुंबात आई-वडील असे तिघेजण होते. २०१० मध्ये पोटाच्या कॅन्सरने शिल्पा यांच्यावरील पितृछायाही हरपली. सध्या आई व शिल्पा या दोघीच जीवनात येणाऱ्या संकटांशी दोन हात करू करून जिद्दीने वाटचाल करीत आहेत. तिची ही जिद्द भल्याभल्यांना लाजविणारी आहे.