शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या गडात भाजपची कडवी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

वाई : वाई तालुक्यातील राजकीय पटलावर शेंदूरजणे गणामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व संवेदनशील असणाऱ्या लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे ...

वाई :  वाई तालुक्यातील राजकीय पटलावर शेंदूरजणे गणामध्ये राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व संवेदनशील असणाऱ्या लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे युवा नेते दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी राष्ट्रवादी विचारांच्या पॅनल प्रमुखांना विचार मंथन करायला लावणारी कडवी झुंज दिली.

सत्ताधारी गटातील नेत्यांना लोहारे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक व सरपंच, उपसरपंच निवडीमध्ये निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले आहे. भाजपचे दत्तात्रय ढेकाणे व वैभव सावंत यांनी लोहारे ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या माध्यमातून येथील निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केल्यामुळे तालुक्यातील व शेंदूरजणे गणातील सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागून राहिले होते. ढेकाणे व सावंत यांनी लोहारेमधील बाजार समितीचे माजी सभापती मोहन जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पॅनलच्या सत्ताधाऱ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली कडवी झुंज आगामी काळात होणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेंदूरजणे गणातील राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांना डोकेदुखी ठरणार असल्याचे संकेत दिल्याने विचार करायला भाग पाडणार असल्याचे बोलले जात आहे.

लोहारे ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजप प्रणित भैरवनाथ पॅनलने ३ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी गटाच्या पॅनल प्रमुखांना जास्तीच्या अवघ्या एका जागेमुळे निसटता विजय मिळवता आला. भैरवनाथ पॅनलच्या मंगल सावंत, नंदा शेलार, प्रशांत गुरव यांनी विजयश्री खेचून आणली. भैरवनाथ पॅनलच्या विजयी उमेदवारांचे खासदार उदयनराजे भोसले, माजी आमदार मदन भोसले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, संचालक रतन शिंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, युवा नेते विकास शिंदे, पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे, भाजप तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, वाईचे नगरसेवक सतीश वैराट यांनी कौतुक केले.