शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

फलटण : ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे. हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी खासदार ...

फलटण : ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे. हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे शनिवारी (दि. २६) चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.

क्रांतिसिंह नाना पाटील चौकात सकाळी ११ वाजता या आंदोलनास प्रारंभ होणार आहे.

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अभिजित नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

जयकुमार शिंदे म्हणाले, ‘सध्याचे सरकार नाकर्ते असून, गतवेळच्या भाजप सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असून, आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे. कोरोना लस कमी पडल्यास केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरड केली जाते व त्याच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यास आम्ही लोकांना मोफत लस पुरवठा करून देऊ, अशा प्रकारच्या वल्गना राज्य सरकारचे प्रतिनिधी करतात.’

या बैठकीस बाळासाहेब काशीद, सुनील जाधव, नानासहेब इवरे, राजेश शिंदे, राहुल शहा, वसीमभाई मणेर, सागर अभंग, किरण राऊत, संतोष सावंत, शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर, सुधीर जगदाळे, नितीन जगताप, तानाजी करळे, रियाजभाई इनामदार, मुक्ती शहा, उषा राऊत, विजया कदम, ज्योती इंगवले, विमल भुजबळ आदींसह भाजपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.