शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘लेटकमर’ कर्मचाऱ्यांना ‘बायोमेट्रिक’चा डोस!

By admin | Updated: May 23, 2016 00:20 IST

कऱ्हाड पालिकेचा निर्णय : ३७४ कर्मचारी मशीनवर; पालिकेत पाच ठिकाणी कार्यान्वित

कऱ्हाड : पालिकेतील कर्मचाऱ्यांनी वेळेवर काम करावे तसेच त्यांच्या नियमित उपस्थितीबाबत माहिती व्हावी, म्हणून पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आता बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आली आहे. पालिकेतील ३७४ कर्मचारी बायोमेट्रिक मशीनवर आल्याने त्यांच्याकडून वेळेचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पालिकेतील ‘कामचुकार’ व लेटकमर्सनी चांगलीच धास्ती घेतली आहे.येथील पालिकेत नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकारी औंधकर यांनी एक फेब्रुवारीपासून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेपूर्वी नऊ वाजून ५५ मिनिटांनी राष्ट्रगीत सुरू करण्याची सूचना करत लेटकमर्सना गुलाबपुष्प देण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत अनेक उपक्रम सुरू केले. पालिकेत उशीर येणाऱ्या व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्तीची सवय लागावी. या मुख्य उद्देशाने मुख्याधिकारी औंधकर यांनी पालिकेतील सुमारे ३७४ कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रिक मशीन बसविण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पालिकेत पाच ठिकाणी बायोमॅट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत.पालिकेची चोवीस तास योजना, विद्युत विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग तसेच जलशुद्धीकरण केंद्र अशा अनेक विभागांत सुमारे ३७४ कर्मचारी काम करतात. त्यांच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या असल्याने त्यांच्या कामाची नोंद पालिकेत करणे गरजेचे असते. मात्र, चुकीच्या नोंदीमुळे काहींचा पगारही रखडण्याच्या समस्या उद्भवलेल्या आहेत. पालिकेत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यालयीन कामाकाजाची वेळ ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे. तर शहरातील स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची वेळ ही पहाटे पाच ते सकाळी नऊ आणि दुपारी दोन ते सायंकाळी सहा अशी आहे. त्या व्यतिरिक्त इतर तीन शिफ्टमध्ये काम करणारेही कर्मचारी आहेत. अशांची कामांची दैनंदिन नोंद ही होणे गरजेचे आहे. हे ओळखून पालिकेत पाच ठिकाणी बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेले आहेत.बायोमॅट्रिक मशीनमुळे पालिकेतील सर्व कर्मचारी, विभागातील अधिकारी यांची कामावर हजर राहण्याच्या वेळेची नोंद होणार आहे. बायोमेट्रिक मशीनवरील नोंदीनुसार कर्मचाऱ्यांचे पगारही आता आॅनलाईन पद्धतीने जमा होण्यास मदत झाल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)कऱ्हाड पालिकेत सुमारे ३७४ कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या कामांची नोंद होणे आवश्यक आहे. नव्याने बायोमेट्रिक मशीन आल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हे चांगले फायद्याचे ठरत आहेत. या मशीनवरील कामाच्या वेळेच्या नोंदीनुसार कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहेत. आॅनलाईनपद्धतीने पगार केले जात आहे. त्याचा कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होत आहे.- विनायक औंधकर,मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका लेटकमर्सनी घेतली धास्ती...पालिकेत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची अधिकाऱ्यांशी अनेकवेळा भेटही होत नाही. कामाच्या वेळी अधिकारी आपल्या संबंधित विभागात उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात असल्याने याचा विचार करत मुख्याधिकारी औंधकर यांनी पालिकेत बायोमेट्रिक मशीन बसविण्याचा निर्णय घेतला. पालिकेत बसविण्यात आलेल्या मशीनमुळे लेटकमर्सनी चांगलीच याची धास्ती घेतली आहे.