शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये मोठी ताकद

By admin | Updated: May 24, 2016 00:53 IST

अजित आपटे : सायगाव येथे फुले-शाहू-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव

सातारा : ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्याविभूषित होऊन विविध क्षेत्रांत आपल्या ज्ञानाचा ठसा उमटविला आहे. आपण गरिबीमध्ये जन्म घेतला असला तरी ज्ञानाच्या श्रीमंतीमुळे जागतिक पातळीवर ते पोहोचले आहेत. डॉ. आंबेडकर या नावामध्ये खूप मोठी ताकद आहे,’ असे प्रतिपादन सायगावचे सरपंच अजित आपटे यांनी केले.जावळी तालुक्यातील सायगाव येथे बौद्ध विकास सेवा संघ, सिद्धार्थ तरुण मंडळ, आदर्श महिला मंडळ यांच्या वतीने गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माजी सभापती वसंतराव मानकुमरे, सुहास गिरी, अजित जगताप, माजी सरपंच अशोक कदम व मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्रेमानंद जगताप होते.‘सध्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा प्रसार झपाट्याने झालेला आहे. याचा वापर ज्ञान वाढण्यासाठी करणे गरजेचे असताना काहीजण त्याकडे मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत आहेत. ग्रामीण भागातील युवापिढीने स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी डॉ. आंबडेकर यांच्यासारखे ज्ञानाचे कण वेचले पाहिजेत. लहानपणी डॉ. आंबेडकर यांचे नाव भीमराव असे ठेवले होते. या भीमरावने ‘भीमक्रांती’ करून सर्वांना भारतीय राज्यघटना दिली. जागतिक पातळीवर त्यांनी शोधनिबंध लिहिले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या विचारांचा प्रसार गतिमानतेने केला आहे. बौद्ध विकास सेवा संघ, सायगाव यांची एकजूट मी लहानपणापासून पाहत आहे. माझे आजोबा अप्पासाहेब आपटे यांनी आम्हाला ‘जात-पात तोडो’चे संस्कार दिले आहेत. ही आमची शिदोरी कायम टिकणार आहे. तसेच गावाच्या विकासासाठी संपूर्ण सहकार्याची भावना आमच्या मनात आहे,’ असे आपटे यांनी स्पष्ट केले.यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक बळवंत जगताप यांना जीवन गौरव व अ‍ॅड. शशिकला जगताप, डॉ. सुप्रिया जगताप, अंकिता जगताप, अभियंता अमित जगताप, भक्ती कांबळे यांनी विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल त्यांच्या मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. प्रारंभी बुद्धवंदना व युगपुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम जयघोषात पार पडला. या कार्यक्रमासाठी शाम जगताप, राजरत्न जगताप, जयवंत जगताप, अनिल जगताप, अशोक जगताप, निनाद जगताप, अशोक कांबळे, बाळू जगताप, बाबू जगताप, कल्पना जगताप, लता जगताप, सुमन सावंत, छाया जगताप यांनी परिश्रम घेतले. मिलिंद जगताप व हंबीरराव जगताप यांनी सूत्रसंचालन केले. भारत जगताप यांनी आभार मानले.(वार्ताहर)सायगाव येथे आयोजित कार्यक्रमात अजित आपटे व इतर.