शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तोट्या नसलेल्या नळांमुळे मोठा तोटा

By admin | Updated: May 12, 2016 23:44 IST

सातारकरांचा पुढाकार : सदरबझार परिसरात स्वखर्चाने केली नळांची दुरुस्ती

सातारा : ‘पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाही कोणी करू शकत नाही,’ असे आपण नेहमी म्हणत असतो; पण पाणी वाचविण्याबाबत आपण नेहमीच टाळाटाळ करत असतो. पण आता पाण्याचे महत्त्व आता कळून चुकल्याने सातारा शहरातील युवक, महिला पाणीबचतीसाठी विविध उपाय करत आहेत. काही नागरिकांनी शहरातील विविध भागांतील नळांना तोट्या बसवून वाया जाणारे पाणी वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.जलसाक्षरतेसाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘जलमित्र अभियाना’ला विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे पाण्याचे मोल समजू लागले आहे. त्यामुळे पाणीबचतीची चळवळ सुरू झाली आहे. ‘जलमित्र अभियान’अंतर्गत साताऱ्यातील निमिश शहा यांनी मित्रांना घेऊन सदर बझार येथील हाउसिंग सोेसायटी, बंगले, झोपडपट्टी या भागांत फिरून तोट्या नसलेल्या नळांचा सर्व्हे केला. त्यानंतर एक प्लंबर बरोबर घेऊन त्यांनी जवळपास वीस नळांना तोट्या बसविल्या. तसेच लिकेजही काढण्यात आले आहे.घरात असलेल्या नळांनाही अनेकजण तोट्या बसवित नाहीत. यासाठी कविता शहा, प्रदीप कामटे हे जलमित्र बनून पाणीबचतीचे आवाहन करत आहेत. (प्रतिनिधी)मोफत प्लंबरची सोयआजही शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी वाया जाते. अशा नळांचा सर्व्हे करून आम्ही त्यांना तोट्या बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. तसेच प्लंबरला बरोबर घेऊन नळांचे लिकेजही काढत आहे. यामुळे काही प्रमाणात पाणीबचत होणार आहे.- निमिश शहा, सातारापाणीबचतीचे आवाहनदुष्काळामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. याबाबत जलमित्र म्हणून नातेवाइक, मित्रपरिवार यांना नळांना तोट्या बसविण्याबरोबरच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत आवाहन करत आहे.- प्रदीप कामटे, सातारा