कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली ता. कऱ्हाड येथील पावकता येथील सिध्दनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे भूमिपूजन महादेव पुजारी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, धैर्यशील पाटील, दादासाहेब चव्हाण, अशोक सावंत, प्रकाश तुपे, अमोल चव्हाण, शुभम चव्हाण, कृष्णत पुजारी उपस्थित होते.
गावात सिध्दनाथ देवाची तीन मंदिरे असून गावाच्या मध्यभागी असणारे मुख्य मंदिर आहे. बनातील सिध्दनाथ मंदिर आणि पावकतातील तिसरे मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीतून करण्यात येत आहे. सिध्दनाथ देवाच्या यात्रेवेळी तिन्ही मंदिरातील देवांचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत असतात. लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी वधू-वर दर्शनासाठी जातात. तसेच प्रत्येक दिवशी सिध्दनाथ देवाची आरती केली जाते. देवाचा मुख्य वार रविवार असल्याने भाविक दर्शनासाठी येतात. पौर्णिमेला भाविक येत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.