शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्सवरील ‘भोसले’, कुठेच नाही दिसले!

By admin | Updated: July 29, 2014 23:06 IST

मुख्यमंत्र्यांचा कऱ्हाड दौरा : अतुल बाबांच्या अनुपस्थितीची ‘हॅटट्रिक’

प्रमोद सुकरे - कऱ्हाड , दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेवरून कृष्णा उद्योग समूहातील भोसलेंची नावे गायब झाली होती़ राजकीय ताणाताणीनंतर लगेच त्याला मलमपट्टी करण्याचा प्रयत्न झाला़ उंडाळकरांच्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या बाबांच्या दरबाराच्या फ्लेक्सवर अचानक भोसलेंचा फोटो झळकला खरा; पण फ्लेक्सवरील भोसले चव्हाणांच्या रविवारच्या दौऱ्यात दिवसभर कुठेच न दिसल्याने दक्षिणेतील राजकीय धुसफूस पुन्हा समोर आली आहे़ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला! यशवंतराव मोहिते आणि विलासराव पाटील-उंडाळकर हे दोनच आमदार या मतदार संघाला माहीत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलू लागली़  अतुल भोसलेंनी राष्ट्रवादीला रामराम करीत काँग्रेस प्रवेश केला़ त्यामुळे भोसलेच दक्षिणेतून विधानसभेला काँग्रेसचे उमेदवार असणार, अशी अटकळ बांधली जात होती अन् त्यांनी दक्षिणेवरील स्वारीची तयारीही चालवलीय़ राज्याच्या विधानसभा निवडणुका आपल्याच नेतृत्वाखाली होणार, याची खात्री पटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेत दिले खरे; पण त्यामुळे प्रत्येक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या गाडीत असणारे अतुल भोसले गाडीतून खाली कधी उतरले अन् मदनदादा गाडीत कधी बसले, हे कोणालाच समजले नाही.दक्षिणेतून लढण्याची तयारीच म्हणून मुख्यमंत्र्यांचे सध्या कऱ्हाड दौरे वाढले आहेत़; पण गत तीन दौऱ्यांकडे अतुल भोसलेंनी पाठ फिरवल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या़ भोसले प्रचाराचाच एक भाग म्हणून मुंबईतही घुसले. तेथे त्यांनी कऱ्हाड दक्षिणेतील मतदारांचा मेळावा घेतला़ तर मुख्यमंत्र्यांचे कऱ्हाड हेलपाटे वाढले. मुख्यमंत्री चव्हाणांनी सलग तीन रविवारी दक्षिणेत कार्यक्रमांची हॅटट्रिक साधली तशी भोसलेंनी अनुपस्थितीची! त्यामुळे ‘हॉट’ ठरलेल्या कऱ्हाड दक्षिणेत काय शिजतंय, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे़ सवादेतील कार्यक्रम म्हणजे काकांच्या बालेकिल्ल्यातील बाबांचा दरबार. त्यामुळे या कार्यक्रमाकडे साऱ्यांचेच लक्ष होते़ कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होतीच; पण विभागात लावण्यात आलेल्या फ्लेक्स बोर्डावर ेमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबरीने आमदार आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ़ सुरेश भोसले, डॉ़ इंद्रजित मोहिते आदींच्या छबी झळकत होत्या़त्यामुळे कृष्णा उद्योग समूहातील मोठे बाबा सबुरीने घेतील, असं समजून आता सारं मिटलंय, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं; पण भोसलेंच्या अनुपस्थितीने त्यांच्या अपेक्षा हवेतच विरल्याचे पाहायला मिळत आहे. मदनदादा म्हणतात, ‘सगळं ठीक होईल’विधानसभेच्या दक्षिणेतील स्वारीची तयारी करणारे अतुल भोसले सध्या स्वकीयांवरच नाराज आहेत म्हणे! मात्र, अतुल भोसलेंचा नामोल्लेख न करता ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, यांनी सवादेत मुख्यमंत्र्यांच्या समोर ‘आमच्यात मतभेद नाहीत़, असले तर दूर होतील सगळं ठिक होईल, तुम्ही काळजी करू नका,’ असं म्हणत उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न के लाय. उंडाळकरांंचे बारीक लक्ष -विरोधकांच्यात सुरू असणाऱ्या धुसफुशीवर आमदार विलसराव पाटील-उंडाळकरांचे बारीक लक्ष आहे़ आजवर प्रत्येक निवडणुकीत विरोधकांमधील कोणीतरी त्यांच्या गळाला लागल्याचा इतिहास आहे़ ‘यंदा आपल्या गळाला कोण लागेल,’ याचा अंदाज ते बांधत असावेत़ -शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्रमाला महाआघाडीचे सदस्य नेते म्हणून डॉ. सुरेश भोसले उपस्थित राहतील, असे अपेक्षित होते; पण त्यांच्यासह ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील यांनीही अनुपस्थित राहणेच पसंत केले.