शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

भोंदू दाम्पत्याला साताऱ्यात अटक;

By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST

मुलगा होण्यासाठी लाटले २८ हजार

सातारा : ‘हमखास मुलगा देतो,’ असा दावा करून येथील एका दाम्पत्याने अंगात देवाचे वारे आणून, विविध तोडगे आणि औषधे देऊन विवाहितेकडून पैसे आणि दागिन्यांच्या रूपात २८ हजारांचा ऐवज लाटल्याप्रकरणी या दाम्पत्याला मंगळवारी अटक करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. विठ्ठल नारायण वायदंडे आणि नंदा विठ्ठल वायदंडे (रा. गणेश चौक, कोडोली) असे अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मुलगा होण्यासाठी आपल्याकडून या दोघांनी वेळोवेळी एकूण १२ हजार रुपये घेतले, तसेच कानातील १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेलही जबरदस्तीने काढून घेतले, अशी फिर्याद सारिका राकेश मोहिते (रा. गणेश चौक, मोहिते चाळ) या महिलेने शहर पोलिसांत दिली आहे. या फसवणुकीत आपली जाऊ शुभांगी प्रशांत मोहिते (रा. जिहे-कटापूर) हिने देवऋषी दाम्पत्याला मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, सारिका मोहिते यांना दोन मुली असून, त्यांना मुलगा होण्यासाठी या दाम्पत्याने अंगात देवाचे वारे आल्याचे दाखवून वेळोवेळी रक्कम घेतली, तसेच कानातील वेल जबरदस्तीने घेतले. त्यामुळे या दाम्पत्यावर फसवणूक, जबरी चोरी आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, निष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘अंनिस’चे प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, शंकर कणसे, श्रीनिवास जांभळे, सीताराम चाळके, युवराज घाडगे, सुनील रणदिवे, शालन वाघमारे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस नाईक आनंदराव भोईटे, मोहन नाचण, संजय जाधव, महेश शिंदे, वैशाली घाडगे, ज्योती गोळे यांनी कारवाईत भाग घेतला. दाम्पत्यावर अचानक कारवाई‘अंनिस’कडे तक्रार झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या सल्ल्यानुसार दाम्पत्याच्या अटकेसाठी तयारी केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनानुसार महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास विठ्ठल आणि नंदा वायदंडे यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. अचानक झालेल्या या कारवाईने आरोपी गोंधळले. (आणखी वृत्त पान ३)