शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमाशंकर’ विस्तारीकरणात येऊ नये

By admin | Updated: June 27, 2016 00:35 IST

उदयनराजे : प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सूचना; पारगाव येथे प्रलंबित कामांची पाहणी

खंडाळा : ‘राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांसाठी पारगाव आणि खंडाळा ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. महामार्गालगत असणाऱ्या पुरातन भीमाशंकर मंदिर महामार्ग विस्तारीकरणात काढण्यात येऊ नये. यासाठी प्राधिकरणाकडे आपण पाठपुरावा करणार आहोत. महामार्गाच्या सहापदरीकरणात लोकांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी प्राधिकरणाने घ्यावी,’ असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले.पारगाव (ता. खंडाळा) येथील महामार्गाच्या प्रलंबित कामाची पाहणी व लोकांच्या अडचणी त्यांनी समजावून घेतल्या. पारगाव येथे पुरातन शिवमंदिर आहे. मात्र, रस्ता रुंदीकरणात मंदिर येत असल्यामुळे ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याबाबत पारगाव ग्रामसभेत मंदिर वाचवून महामार्ग बनवावा, असा ठराव घेण्यात आला होता. तरीही हायवे प्रशासनाने व संबंधित ठेकेदारांनी यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याचबरोबर सेवारस्त्याचीही कामे झालेली नाहीत. त्यामुळे मंदिर वाचवण्यात यावे अथवा उड्डानपूल मोठा करण्यात यावा, अशा समस्या ग्रामस्थांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यापुढे मांडल्या. या सर्व प्रश्नांबाबत प्राधिकरण अधिकाऱ्यांशी मी स्वत: चर्चा करून मार्ग काढेन, असे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामस्थांना अडचणी होणार नाहीत. याची खबरदारी घ्यायला लावणार आहे, असेही त्यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, सरपंच अश्विनी पवार, अशोक जाधव, भानुदास यादव, महेश गायकवाड, मारुती पवार यांसह पारगावमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) ‘लोकमत’ ची दखलपारगाव येथील भुयारी मार्गाची दुरवस्था असल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांना जाण्यासाठी मोठी अडचण होत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी पर्याय नाही. यावर तोडगा काढावा, अशी तातडीने मागणी करत ‘लोकमत’ने याबाबत ‘भुयारी मार्गाची दुर्दशा’ अशी बातमी देऊन आवाज उठवला होता. हे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.