शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

‘भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली

By admin | Updated: December 7, 2015 00:27 IST

मुक्ता दाभोलकर : ‘संबोधी’च्या वितरण सोहळ्यात अनेक सामाजिक विषयांना उजाळा

 सातारा : संबोधी प्रतिष्ठानने दिलेल्या ‘मातोश्री भीमाई’ पुरस्काराने समाजकार्याची उमेद वाढली असून, यापुढील काळात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे कार्य जोमाने सुरू ठेवणार असल्याचे मुक्ता दाभोंलकर यांनी सांगितले. पुरस्काराची पाच हजारांची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.साहित्य, सांस्कृतिक तसेच समाजकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीला संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा दया पवार यांच्या हस्ते रविवारी मुक्ता दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुक्ता दाभोलकार बोलत होत्या.हा कार्यक्रम विविध मान्यवर व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. व्यासपीठावर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब होवाळे, दिनकर झिंब्रे, रमेश इंजे हे होते. या कार्यक्रमास डॉ. चित्रा दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, किशोर बेडकिहाळ ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, अभय सरू, अभय कांता उपस्थित होते. (प्रतिनिधी)डॉ. दाभोलकरांचे कार्य पुढे सुरू ठेवणार... ---संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने १८ वा ‘मातोश्री भीमाई आंबेडकर’ पुरस्कार मुक्ता दाभोलकर यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे होते. पुरस्काराची रक्कम अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी खर्च करणार असल्याचे सांगून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘माझे बाबा डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अनेक लोकांशी आपली नाळ जोडली होती. त्यांनी सुरू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य मी जोमाने पुढे सुरू ठेवणार आहे. संबोधी प्रतिष्ठान ज्या मुल्यांच्या आधारावर कार्य करीत आहे, त्यावरच मी काम करीत आहे. या पुरस्काराने मला त्यासाठीचे बळ मिळाले असून, उमेद वाढली आहे. मला हा पुरस्कार मिळाल्याने मी खरोखरंच भाग्यवान समजते.’मुक्ता दाभोलकरांचे कार्य कौतुकास्पद अध्यक्षीय भाषणात प्रज्ञा पवार यांनी मुक्ता दाभोलकरांचे कौतुक केले. तिला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे, ‘अत्यंत इष्ट अभिवाट आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना ही खरी श्रद्धांजली ठरणार आहे. सध्याचा काळ स्त्रीविषयी हिंसाचार वाढण्याचा आहे. कौर्याला शौर्य समजून वाटचाल करणाऱ्या संघटना वाढल्या आहेत. असा आरोपही याप्रसंगी प्रज्ञा पवार यांनी केला.कार्यक्रमात दिनकर झिंब्रे, अण्णासाहेब होवाळे आदींनी मनोगत व्यक्त केले.