शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

‘डॉल्बीमुक्ती’मुळे वीस लाखांचा लाभ

By admin | Updated: September 20, 2015 23:46 IST

वाठार स्टेशन पोलीस ठाणे हद्द : ४७ पैकी २३ गावांत ‘एक गाव एक गणपती’

वाठार स्टेशन : ध्वनी प्रदूषण, गोंगाट, व्यसनाधीनता व गणेश मंडळांचे होणारे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी जिल्ह्यात डॉल्बीमुक्तीचा ऐतिहासिक गजर झाला. त्यासाठी ‘लोकमत’ ने पुढाकार घेऊन ही चळवळ गावोगावी वाडी-वस्तीपर्यंत पोहोचवली. त्यास पोलीस प्रशासनानेही पाठबळ दिल्याने जिल्ह्यासह कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत ४७ गावांपैकी आत्तापर्यंत २३ गावांनी डॉल्बीला हद्दपार करण्याचा निर्धार केला आहे. या माध्यमातून या गावातील या मंडळांची जवळपास वीस लाखांची बचत होणार आहे.कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिसांच्या आवाहानानंतर या पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक गावात जाऊन वाठार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी व ग्रामस्थांना डॉल्बी बंदीबाबतची जागृती केली. यास जवळपास २३ गावांतील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत डॉल्बीबंदीची घोषणा केली. ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमात सहभाग नोंदवला.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील २३ गावांनी आत्तापर्यंत ‘एक गाव एक गणपती’ बसवण्याचा तर उर्वरित २४ गावांतील ८८ गणेश मंडळांनी अशा एकूण १११ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशमूर्ती बसण्याचा संकल्प केला आहे. यावर्षी २३ गावांसाठी वाठार पोलीस ठाण्याच्या वतीने ‘गणराया अ‍ॅवॉर्ड’ देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तसेच उत्कृष्ट समाज प्रबोधनात्मक देखाव्यासाठी विषेश पुरस्कार देण्यात येणार आहेत.यावर्षी दुष्काळी परस्थिती असल्यामुळे गणेश मंडळांना आर्थिक टंचाई भासणार आहे. परंतु डॉल्बीबंदी केल्यामुळे या मंडळाचे बजेट कमी होणार आहे. प्रत्येक वर्षी डॉल्बी, डीजेसारख्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या यंत्रणेवर वीस लाखांहून अधिक रक्कम खर्ची पडत होती. साधारण डॉल्बी वाजवण्यासाठी तीस हजारांपासून ५० हजारांपर्यंतचा खर्च एका मंडळास करावा लागत होता.कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात डॉल्बीमुळे केवळ गोंगाट नव्हे, तर भांडण, तंट्यापासून ही मुक्ती मिळणार आहे. नाचण्याच्या कारणावरून गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचे वादही थांबणार आहेत. यातून होणाऱ्या पैशाच्या बचतीमधून मंडळांनी सामाजिक जबाबदारी म्हणून शाळकरी मुलांना शालेय साहित्य वाटप करावे. तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक निकम यांनी केले आहे. (वार्ताहर) उल्लंघन झाल्यास कारवाई...वाठार पोलीस ठाण्याअंतर्गत आत्तापर्यंत २३ गावांतील गणेश मंडळांनी डॉल्बीबंदीला हिरवा कंदील दाखविला आहे. उर्वरित गावांतील मंडळांनाही पोलिसांच्या वतीने डॉल्बी बंदीबाबत आवाहन करण्यात आले आहे. डॉल्बी वाजवण्याबाबत जी आवाजाची क्षमता ठरवून दिली आहे. त्याचे उल्लंघन मंडळाकडून झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.- शहाजी निकम, सहायक पोलीस निरीक्षक