शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ पाटणसाठी घंटागाडी नक्कीच उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

रामापूर : पाटण नगरपंचायत झाल्यापासून शहरात विविध विकासकामे सुरूच आहेत. पाटण शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्नशील ...

रामापूर : पाटण नगरपंचायत झाल्यापासून शहरात विविध विकासकामे सुरूच आहेत. पाटण शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नगरपंचायत सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शहरातील विविध भागातून ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीने आणलेल्या घंटा गाडी नक्कीच उपयोगी ठरतील. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीतच टाकावा,’ असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले.

पाटण नगरपंचायतीकडून शहरातील कचरा गोळा करण्यासाठी चार घंटागाडी खरेदी केल्या आहेत. त्यांचा लोकार्पण नगरपंचायतीच्या प्रांगणात कोविडचे नियम पाळून पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष ॲड. अविनाश जानुगडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, नगराध्यक्ष अजय कवडे, उपनगराध्यक्ष विजय टोळे, मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, नगरसेविका सरस्वती खैरमोडे, सुषमा महाजन, योगीता कुंभार, अनिता देवकांत, नगरसेवक किरण पवार, उमेश टोळे, ॲड. सचिन देसाई यांची उपस्थिती होती.

मुख्याधिकारी अभिषेक परदेशी म्हणाले, ‘शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपंचायतीने चार घंटागाड्या खरेदी केल्या आहेत. त्यामुळे शहरातील कचरा गोळा करण्यात कोणतीही अडचण आता येणार नाही. नागरिकांनी इतरत्र कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. त्याचबरोबर घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपंचायतीकडून भाडे तत्त्वावर जागा उपलब्ध केली आहे. त्याठिकाणी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. ही प्रक्रिया केल्यानंतर परिसरातील नागरिकांना त्याचा कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची पूर्णत: दक्षता घेतली आहे.’

यावेळी शहरात घंटागाड्या रोजच्या रोज फिराव्यात. कचरा गाडीत कचरा टाकण्यासाठी नगरपंचायतीकडून गाडीवर स्वतंत्र कर्मचारी नेमावा. आठवड्यातून एकदा तरी गटर स्वच्छ करावेत. गटर साफ केल्यानंतर तत्काळ कचरा उचलावा. चिकन व्यावसायिकांकडून पाटण शहराच्या प्रवेशद्वाराजवळ दररोज सायंकाळी घाण टाकली जाते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून साथरोग उद्‌भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा दुकानदारांवर कडक कारवाई करावी. शहरातील सोयी-सुविधांबाबतच्या सूचना नागरिकांनी यावेळी केल्या. यावर नगरपंचायतीकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून नागरिकांना सहकार्य केले जाईल. नागरिकांनीही नगरपंचायतीला सर्वोतोपरी सहकार्य करावेत, अशी अपेक्षा नगराध्यक्ष अजय कवडे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष अजय कवडे यांनी स्वागत केले. उपनगराध्यक्ष विजय टोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विलासराव क्षीरसागर, दीपक पाटणकर, दिलीप मोटे, माजी उपसरंपच चंद्रकांत मोरे, राजाभाऊ कांबळे, आबासाहेब भोळे, नामदेव कुंभार, मनीष मोळावडे, अनिल बोधे उपस्थित होते.