शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली

By admin | Updated: January 10, 2017 22:53 IST

हजर होण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाईला बदली

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील करवीर विभागीय पोलिस उपअधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वीच आर. आर. पाटील यांची वाई (जि. सातारा) येथे पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्तीचे आदेश गृहविभागाने मंगळवारी दुपारी काढले. त्यांच्या जागी औरंगाबादहून हर्ष पोतदार यांची नियुक्ती केली. मंगळवारी सकाळी सातारा पोलिसांनी पाटील यांचा सत्कार करून निरोपही दिला. ते कोल्हापुरात पदभार स्वीकारण्यासाठी येत असतानाच बदलीचे आदेश पुन्हा आले. त्यांच्या अशा तडकाफडकी बदलीची पोलिस दलात जोरदार चर्चा सुरू आहे.राज्यातील ७८ पोलिस निरीक्षकांना पोलिस उपअधीक्षकपदी बढती देण्यात आली होती. त्यामध्ये कोल्हापूर पोलिस दलातील आर्थिक गुन्हे शाखा व वेल्फेअरचे पोलिस निरीक्षक आर. आर. पाटील यांचा समावेश होता. पाटील यांची सातारा गृहपोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. गेले महिनाभर ते तेथील कामकाज पाहत होते; परंतु दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या आर्इंची प्रकृती तितकीशी बरी नसते, त्यामुळे पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यात बदलीसाठी विनंती त्यासाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील यांनीही सरकारला विनंती केली. त्याची दखल घेवून त्यांची करवीर चे उपअधीक्षक म्हणून बदली झाली. त्यासाठी पदभार घेण्यास ते साताऱ्याहून निघाले परंतू तोपर्यंतच वाटेत असतानाच त्यांच्या नवीन बदलीचे आदेश आले. सातारा पोलिसांनी मंगळवारी सत्कार करून पाटील यांना निरोप दिला. आणि त्याच जिल्ह्यांत पुन्हा त्यांना आता रुजू व्हावे लागणार आहे. अशा पध्दतीने बदली झाल्याने ते कमालीचे नाराज झाले. त्यांच्या आतापर्यंतच्या सेवाकाळात असा कधी अपमान झाला नसल्याची भावना त्यामुळे व्यक्त झाली.