शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चांगले डॉक्टर बनण्यापूर्वी चांगला माणूस बना !

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

नितीन गडकरी : कृष्णा विद्यापीठाचा पाचवा दीक्षांत सोहळा; ४२६ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

कऱ्हाड : ‘छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, तुकाराम आदींकडे कोणतीही पदवी नव्हती; मात्र तेच लोक आज शिक्षण क्षेत्रातील अनेक शाखांमध्ये अभ्यासाचे विषय बनले आहेत. ही बाब लक्षात घेतली पाहिजे. आपण आज वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेत आहात. भविष्यात तुम्ही चांगले डॉक्टर जरूर बना; पण त्या अगोदर एक चांगला माणूस म्हणूनही ओळख बनवा. मोफत वैद्यकीय सेवा देऊ नका; मात्र वैद्यकीय सेवाभाव विसरू नका,’ असे भावनिक आवाहन केंद्रीय रस्ते विकास व जहाजमंत्री नितीन गडकरी यांनी केले. येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी, डॉ. आर. के. अयाचित, विनायक भोसले, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. अतुल भोसले, डॉ. आर. के. गावकर, पी. डी. जॉन, डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. आर. जी. नानिवडेकर, डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. शशिकिरण एन. डी., डॉ. जी. वरदराजुलू, वैशाली मोहिते, डॉ. एस. सी. काळे, डॉ. सुजाता जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. भरत पाटील उपस्थित होते. मंत्री गडकरी म्हणाले, ‘शिक्षण ही माणसाच्या जीवनात अतिशय महत्त्वाची बाब आहे. पदवीदान समारंभ हा एक आनंदाचा क्षण आहे. पण शिक्षणाने माणूस केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही. तर तो सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. एखाद्या अभ्यासाची पदवी हातात मिळाल्यावर आत्मविश्वास वाढायला पाहिजे; पण अनेकदा अहंकार वाढलेला दिसतो. ही बाब चुकीची आहे. ज्ञानाबरोबर संस्कार मिळाले की परिपूर्ण माणूस तयार होतो. त्यामुळे यापुढच्या काळात केवळ विद्वान लोक तयार करून उपयोग नाही. तर त्यांना चांगले नागरिक बनविणे गरजेचे आहे.’ ‘आमचा देश धनवान आहे; पण इथले लोक गरीब आहेत. तरीही भारताकडून जगभरातील अनेक देशांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी इथल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. शिक्षणाचा प्रसार अन् रोजगारनिर्मितीबाबत लक्ष दिले पाहिजे. कोणतीही परीक्षा ही जीवनातील अंतिम परीक्षा न समजता रोज नव्या परीक्षांना सामोरे गेले पाहिजे. जे लोक परीक्षेला महत्त्वपूर्ण मानतात, तेच लोक इतरांसाठी आदर्श बनतात. शिक्षणाच्या माध्यमातून आज रोज नवीन संशोधन होत आहे. हे संशोधन करणारे गुणवान लोकच भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात,’ असेही त्यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एखाद्या विषयातील पदवी हा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड असतो; पण वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळं आहे. याची जाण अन् भान आज पदवी घेणाऱ्यांनी ठेवले पाहिजे.’ डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘शिक्षण हा प्रगतीचा मार्ग आहे, ही भूमिका बाळगून दिवंगत जयवंतराव भोसले यांनी कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतूनच हे विद्यापीठ साकारले असून, आता हे विद्यापीठ देशातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनत आहे. (प्रतिनिधी) इव्हॉन याँग पै सेज तीन पदकांची मानकरी एमबीबीएस अधिविभागातील इव्हॉन याँग पै सेज या विद्यार्थिनीने दिवंगत गोविंंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनीसाठी दिले जाणारे डॉ. एम. एस. कंटक अ‍ॅवॉर्ड आणि डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार पटकावून सर्वाधिक तीन पदकांची मानकरी ठरली. विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणाऱ्या दिवंगत जयवंतराव भोसले सुवर्ण पदकाची मानकरी मिखिला किशोर खेडकर ठरली. तसेच कोमल धनंजय कुलकर्णी हिने यूएसव्ही सुवर्णपदक व डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार, तसेच स्रेहल महादेव सोमावर, मृण्मयी गिरीश लिमये, प्रणव गजानन देवधर, डॉ. मेहुल पोपटलाल ओसवाल, डॉ. तस्नीम विक्रमसिंंग बिष्ट व डॉ. राजश्री बाळासाहेब भोसले यांनीही विविध पारिताषिके पटकाविली.