शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांमुळे मंत्रिपद हुकले असाव

By admin | Updated: January 23, 2015 00:46 IST

राजू शेट्टी : ...तर आंदोलनातील नुकसानीला शासन जबाबदारे

सांगली : आंदोलन करणारे मंत्रिमंडळात नसावेत, असे सरकारला वाटत असावे किंवा जयंतरावांच्या इशाऱ्याने आमचे मंत्रिपद हुकले असावे, असा उपहासात्मक टोला खासदार राजू शेट्टी यांनी आज, गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना लगावला. ते म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना जशी आहे तशीच आहे. आम्हाला बदलण्याची गरज नाही. आम्ही सरकारमध्ये सहभागी नसून सरकारबद्दल आम्हाला केवळ सहानुभूती आहे. गतवेळच्या सरकारपेक्षा हे सरकार बरे आहे; पण ‘अच्छे दिन’ येणार, असा भाबडा विश्वास बाळगण्यात अर्थ नाही. शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन अजूनही यायचे आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत या सरकारनेही दखल घेतली नाही, तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. त्यावेळी सरकार कोणाचे आहे, हे आम्ही पाहणार नाही. एफआरपीप्रमाणे कारखाने दर देणार नसतील, तर शासनाने त्यांची गोदामे सील करावीत आणि फौजदारी दाखल करावी, अन्यथा गोदामे आम्हाला बंद करावी लागतील. अशावेळी जी परिस्थिती उद्भवेल व जे नुकसान होईल, त्यास शासन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला. एफआरपीसाठी पुरेसा वेळ आम्ही सरकार आणि कारखानदारांना दिला आहे. आता त्यांनी एफआरपीप्रमाणे दर द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. शासनाने खरेदी कर माफ केला आहे. त्याशिवाय इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार आहे. साखर निर्यातीबाबतही लवकरच केंद्र शासनाचा निर्णय होईल. त्यावेळी किमान २० लाख टन साखर निर्यात झाली, तरी देशातील साखरेचा शिल्लक साठा आणि मागणी यांचे संतुलन राहील. आमच्यादृष्टीने साखर कारखानदारांसाठी शासनाने जे करायचे ते केले आहे. आता शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)जयंतरावांवर हल्लाबोलजयंत पाटील यांच्या आरोपांबाबत ते म्हणाले की, जयंतरावांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे तीन हजार रुपये दर द्यावा. त्यांनी दर दिल्यानंतर खुशाल माझा जिल्हाभर निषेध करावा. जयंतरावांच्या इशाऱ्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रिपद हुकले असावे, असे मत व्यक्त केल्यानंतर शेट्टी यांनी, याबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. पृथ्वीराज चव्हाणांनी काय दिवे लावले?आम्ही आंदोलनाचे नाटक करतो, असा आरोप करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या कालावधीत काय दिवे लावले, हे आधी जाहीर करावे, असा पलटवार खासदार शेट्टी यांनी केला. आघाडी सरकारच्या काळात ऊस दराच्या प्रश्नावर पंतप्रधानांची भेटही होऊ शकत नव्हती. आताच्या सरकारमध्ये लगेच पंतप्रधानांशी चर्चाही होते. दोन्ही सरकारमध्ये हा फरक आहे. पवारांनी बैठक का टाळली?एफआरपीबाबत पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला अजित पवार यांनी जायचे टाळले. विरोधी पक्षातील सक्षम नेत्याने या बैठकीला उपस्थित राहावे, अशी अपेक्षा असताना, त्यांनी जाणीवपूर्वक ही बैठक टाळून इस्लामपुरातील सभेला जाणे पसंत केले. यासाठीही जयंतरावांनीच इशारा केला होता का, असा सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.