शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

धान्य मळताना सीए बनला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2016 08:29 IST

भोसलेवाडीत आनंदाचे वातावरण : पेपर फेरतपासणीनंतर मिळाली उत्तीर्ण झाल्याची बातमी

अजय जाधव -- उंब्रज भोसलेवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आशिषने सीए ची परीक्षा दिली.. निकाल नापास म्हणून आला; पण खचून जाईल, असं हे शेतकऱ्याचं पोर नव्हते. स्वत:वर ठाम आत्मविश्वास होता. आपण लिहिलेले पेपरची खात्रीही होती. फेरतपासणीचा अर्ज केला. फेरतपासणीत आशिष सीए झाल्याचा निकाल आला आणि वाढदिवसाच्या दिवशीच दिल्ली बोर्डाने ही भेट दिली. भोसले दाम्पत्यांनी दिवसरात्र केलेल्या कष्टाचे फळ मिळाले.आशिष मनोहर भोसले. आई-वडील शेतीत कष्ट करतात. या आशिष व दोन बहिणीचे शिक्षण ऐवढेच यांचे ध्येय होते. तुटपुंजा उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून तिघांचे शिक्षण करण्याची कसरत हे दाम्पत्य करत होते. आशिष १२ वी झाला; पण सीए होण्याच्या या ध्येयाने झपाटल्यामुळे त्याने पुणे येथे पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. नोकरी केली. आपल्याबरोबर दोन बहिणींनाही पुणे येथे शिक्षणाला नेले. आज एक बहीण वकील झाली आहे तर दुसरी अकाउंटचे शिक्षण घेत आहे.अशा आर्थिक परिस्थितीतून आशिषने नोकरी करत सीए ची परीक्षा दिली. जीवनात संघर्ष अटळ असतो. परंतु काहीजणांना प्रत्येक घडामोडीत संघर्ष हा करावाच लागतो. त्याप्रमाणे आशिषला निकालासाठीही फेरतपासणी अर्ज करावा लागला. यश खेचून आणावे लागले. ही माहिती मिळाल्यानंतर प्रस्तूत प्रतिनिधी त्यांच्या घरी भेट देण्यासाठी गेला. तेव्हा आशिष हा आपल्या शेतातील गहू मळत होता. सीए झालो तरी मूळ शेतकरी आहे. शेतीचे काम करणारच असे सांगून त्याने आपली सर्व माहिती हसत सांगितली आणि मी माझे करिअर पुणे येथे करणार आहे. परंतु येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन मुलांना कायम मार्गदर्शन करणार आहे. माझ्या गावातील लोकांनाही अकाऊंटंट मधील माहिती विनामूल्य देण्याचा प्रयत्न करणार आहे. वाढदिनी गिफ्ट!१० मार्च हा आशिषचा वाढदिवस. या दिवशीच ‘दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टड अकाऊंटंट आॅफ इंडिया’ कार्यालयातून आशिषला फोन आला. ‘आप पास हो गये’ परंतु आशिषने हे कोणाला सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी नेटवर निकाल जाहीर झाला. निकालाची प्रिंट काढली. पुणेहून थेट भोसलेवाडीला आला. आई-वडिलांना सरप्राईज दिले. यावेळी त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद यातच माझे यश होते, असे आशिषने ‘लोकमत’ ला सांगितले.