शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

लाल दिव्यासाठी भगीरथाची बारामतीची चाकरी

By admin | Updated: May 5, 2017 22:55 IST

हिंदुराव नाईक-निंबाळकर : ‘नीरा-देवघर’ प्रकल्पाच्या पाण्यासाठी जनआंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : ‘तालुक्याचा कायमचा दुष्काळ दूर करू शकणाऱ्या नीरा-देवघर कालव्याची कामे स्वत:ला भगीरथ म्हणून घेणाऱ्या नेत्याच्या लाल दिवा बचाव धोरणामुळे आणि बारामतीकरांच्या चाकरीमुळे रखडली असून, बारामतीकरांना पाणी मिळावे म्हणूनच ते कामे रखडवत असून, संबंध नसताना बारामतीला पाणी जात आहे. कालव्याची कामे पूर्ण करण्यासाठी आता जनआंदोलन उभारणार आहे,’ असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.नीरा-देवघर धरण प्रकल्पाची वस्तुस्थिती व तालुक्यावर पाणी वाटपात झालेला अन्याय या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, काँग्रेस सातारा उपाध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, शिवाजीराव फडतरे, फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे, फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, नगरसेवक अशोक जाधव, अशोकराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नीरा-देवघर प्रकल्पाद्वारे ११,०९१ टीएमसी पाणीसाठा निर्माण करणे व १९८ किलोमीटर लांबीच्या उजव्या कालव्यावरील प्रवाही सिंचनाबरोबर वेनवडी, गावडेवाडी, शेखमिरेवाडी व वाघोशी या चार उपसा सिंचन योजना व २१ किलोमीटर लांबीच्या नीरा-देवघरच्या डाव्या कालव्याद्वारे भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस या चार तालुक्यांतील ४३,०५० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन झाले होते. या प्रकल्पावर जानेवारी २०१७ अखेर ७१,६०७ लाख इतका खर्च झाला आहे. या धरणाच्या क्षेत्रात ५७ गावे येत असून, ११,८६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. फलटण तालुक्यातील ५१ गावांतील १३,५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. धरणामध्ये प्रतिवर्षी १३ टीएमसी पाणी साठत आहे. केवळ कालव्याची कामे संथगतीने सुरू असल्याने पाणी उपलब्ध असूनही त्याचा वापर सिंचनासाठी करण्यात येत नाही. नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असूनही वरील तिन्ही तालुक्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागले नसते आणि लाभ क्षेत्रात नसूनही नीरा-देवघर धरणाचे पाणी नीरा डाव्या कालव्यामार्फत बारामती व इंदापूूरला सिंचनासाठी उपलब्ध झाले नसते. हे दुर्दैवी चित्र गेली बारा ते तेरा वर्षे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आता खंडाळा, फलटण व माळशिरस या तालुक्यांना हे पाणी मिळण्यासाठी नीरा-देवघर उजव्या कालव्याचे काम युद्धपातळीवर व वेगाने सुरू होणे गरजेचे आहे. या कालव्याची प्रलंबित कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसूनही आपल्या हक्काचे पाणी कायमस्वरुपी बारामतीला मिळेल. फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे ही कामे तातडीने पूर्ण होणे आवश्यक असून, त्यासाठी जनआंदोलन उभारणार आहे.’ नीरा-देवघर प्रकल्प केंद्रीय जल आयोगामधून मंजूर होऊन ‘एआयबीपी’मधून याला भरीव मदत मिळवण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले नसल्याचा आरोप करून आता केंद्र्रातून निधी मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न करायला हवे ते न करता शिवतारे यांनी जेजुरी व सासवडला पाणी नेले असल्याचेही यावेळी हिंदुराव यांनी सांगितले. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान म्हणाले, ‘नीरा-देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव नाईक-निंबाळकर व मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. कृष्णा खोरे महामंडळाच्या अंतर्गत हा प्रकल्प येतो. रणजितसिंह नाईक-निंबाळकर उपाध्यक्ष झाल्यावर या प्रकल्पासाठी १४२ कोटींचा निधी त्यांनी त्वरित मंजूर केला. त्यानंतर सरकार बदलल्यामुळे पुढील कामकाज होऊ शकले नाही.’ दिगंबर आगवणे यांनी आभार मानले.