शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
3
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
4
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
5
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
6
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
7
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
8
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
9
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
10
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
11
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
12
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
13
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
14
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
15
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
16
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
17
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
18
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
19
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
20
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  

तांबवेत ‘बॅनर वॉर’ला बगल !

By admin | Updated: October 25, 2015 00:21 IST

फलकविरहित निवडणूक : वादावादीच्या घटनांना बसणार आळा

दीपक पवार ल्ल तांबवे राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या तांबवे गावच्या ग्रामपंचायत निवडणकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येथे १३ जागांसाठी ३१ उमेदवार रिंंगणात आहेत. वॉर्ड क्रमांक १ व ५ मध्ये तिरंगी लढत व वॉर्ड क्रमांक २, ३ व ४ मध्ये दुरंगी लढत होत आहे. यामध्ये तिन्ही पॅनेलच्या प्रमुखांनी यावेळची निवडणूक बॅनरविरहित करण्याचा निर्णय घेतला आहे. गावात प्रचाराचा कसलाही बॅनर लावला जाणार नसल्याने वादावादीचे प्रसंग टळणार आहेत. तांबवेतील ग्रामपंचायत निवडणूकही नेहमी वादाची व संघर्षाची होते. गाव पाटण विधानसभा मतदार संघाला जोडलेले असल्यामुळे येथे ‘सतरा कारभारी’ असल्याचे नेहमी पहावयास मिळते. यावेळीही गावात निवडणूकीचा चांगलाच फड रंगला आहे. तिन पॅनेलच निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. येथे एकूण चार हजार मतदार तर ५ वॉर्ड आहेत. यावेळी सरपंचपद इतर मागास प्रवर्ग पुरूषासाठी आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील, अविनाश पवार, माजी सरपंच प्रदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल, निवासराव पाटील, आनंदा ताटे, प्रकाश चव्हाण यांचे भैरवनाथ तर सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील, अशोक पाटील, सतीश पाटील, रामचंद्र पवार व प्रकाश पवार यांचे तांबजाई पॅनेल निवडणुक रिंगणात आहे. या पॅनेलमधून अनेक उमेदवार नशिब आजमावत आहेत.  

निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष तिन्ही पॅनेलच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तांबवे गावची ग्रामपंचायत निवडणूक विनाफलक पार पडणार आहे. फलक लावण्यावरून येथे यापुर्वी वादावादीचे प्रकार घडले आहेत. तांबवे गावची ग्रामपंचायत सन २०१५-१६ मध्ये अमृत महोत्सवात पदार्पण करीत आहे. यातच निवडणूक लागली आहे. तांबवे गाव पाटण मतदार संघाला जोडल्यामुळे येथे आमदार शंभूराज देसाई, विक्रमसिंह पाटणकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचे गट आहेत.