शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर वाजतच राहिला बँकेचा ‘सायरन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:33 IST

तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा सायरन बुधवारी रात्रभर वाजतच राहिला. शेवटी गुरुवारी सकाळी सायरन ...

तरडगाव : फलटण तालुक्यातील तरडगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा सायरन बुधवारी रात्रभर वाजतच राहिला. शेवटी गुरुवारी सकाळी सायरन बंद करण्यात आला. वर्षभरापूर्वी एक-दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा एखाद्यावेळी प्रत्यक्षात चोरीची घटना घडून सायरन वाजल्यावर नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतील.

याबाबतची माहिती अशी की, गावच्या मुख्य बाजारपेठेत मध्यभागी बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास बँकेचा सायरन वाजण्यास सुरुवात झाली. तो रात्रभर तसाच वाजत राहिला. सायरन वाजण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. यामुळे कदाचित नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले असावे, असे काहींनी सांगितले. गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बँक कर्मचाऱ्याने बँकेत येऊन सायरन बंद केला.

चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येक बँकांमधून सायरन यंत्र बसविण्यात आलेले असतात. बँक तिजोरीतील रोकड रकमेची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यानुसार प्रत्येक अधिकाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेतली जाते. आजवर अनेकदा ठिकठिकाणी विविध बँकेत पाल यासारखा कीटक सेन्सरमध्ये गेल्याने अथवा यंत्रातील बिघाडामुळे विनाकारण सायरन वाजल्याच्या घटनेने अनेकांची भंबेरी उडाल्याचे पाहिले आहे.

तरडगाव येथील बँक परिसरातील विविध गावचे व वाड्या-वस्त्यांवरील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी मोठी गर्दी करीत असतात. येथे दररोज मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यामुळे विनाकारण असे रात्रीचे सायरन वाजण्याचे प्रकार वेळीच थांबले पाहिजेत. नाहीतर एखाद्या वेळी चोरीची मोठी दुर्घटना घडली तरी नागरिक ‘लांडगा आला रे आला...’ या गोष्टीप्रमाणे दुर्लक्ष करतील. यामुळे यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट -

नागरिकांना हकनाक त्रास

बुधवारी रात्रभर सायरन वाजत राहिल्याने परिसरातील नागरिक वैतागले होते. अनेकांची झोपमोड झाली. यामुळे सायरन यंत्रात बिघाड आहे का? हे तपासावे. तसेच यापुढे अशा घटना वारंवार होणार नाहीत याची दक्षता बँकेने घ्यावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.