शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आज बँकिंग केवळ नेटवर!

By admin | Updated: November 11, 2014 23:17 IST

कर्मचारी संपावर : राष्ट्रीयीकृत बँका बंद; पण ‘टेक्नोसॅव्ही’ सुरक्षित

सातारा : देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी (दि. १२) संपावर जात असले, तरी ‘टेक्नोसॅव्ही’ ग्राहक सुरक्षित राहणार आहेत. शाखा बंद राहणार असल्या, तरी नेट बँकिंग सुरूच राहणार आहे. एटीएममध्येही पूर्ण क्षमतेने रकमेचा भरणा करण्याची काळजी बँकांनी घेतली आहे.२३ टक्के वेतनवाढीची मागणी अमान्य झाल्याने ‘युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स’ (यूएफबीयू) या नऊ संघटनांच्या संघाने हा संप पुकारला असून, कनिष्ठ अधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. या संघात राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांबरोबरच काही व्यापारी बँकांच्या कर्मचारी संघटनाही सहभागी आहेत. परंतु उर्वरित व्यापारी बँका आणि सहकारी बँका बुधवारी सुरूच राहणार आहेत.पैसे काढण्याचे व्यवहार बँक ग्राहकांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असतात. एटीएमधारकांना हे व्यवहार संपकाळातही शक्य असल्याने एटीएम कार्ड नसलेल्या तसेच ग्रामीण ग्राहकांची गैरसोय होणार आहे. तसेच भरणा करण्याची मोजकीच यंत्रे शहरात असल्याने अनेकांचा भरणा रखडण्याची शक्यता आहे. मनी ट्रान्स्फरचे व्यवहार इंटरनेटवर शक्य असल्याने व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही. नेट बँकिंगचा वापर करणारे ग्राहकही सुरक्षित राहणार आहेत. प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांसाठी धनाकर्ष पाठवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अडचण होणार आहे. (प्रतिनिधी)अशा आहेत मागण्या‘इंडियन बँक्स असोसिएशन’बरोबर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींची चौदावी फेरी फिसकटल्यानंतर संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. पगारवाढीबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांमधील निर्गुंतवणुकीचे धोरण मागे घ्यावे, एनपीए वसूल करावेत, जनधन योजनेस सहकार्य करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.