शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांची बँक खाती होणार सील!

By admin | Updated: February 26, 2017 00:37 IST

सातारा पालिका : पाचशे मिळकतदारांना जप्ती वॉरंटच्या नोटिसा

सातारा : मिळकतदारांकडून शंभर टक्के वसुली व्हावी, यासाठी सातारा पालिका नव-नवे फंडे अमलात आणत आहे. करापोटी थकबाकीदारांना धडा शिकविण्यासाठी त्यांचे घर सील करणे, तसेच नळ कनेक्शन आजवर तोडले जात होते; पण आता याबरोबरच बँक खातेही कसे सील करता येईल, यासंदर्भात पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच यावर निर्णय होणार आहे.सातारा पालिकेमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी न भरलेले पाचशेहून अधिक थकबाकीदार आहेत. या मिळकतदारांना गेल्या आठ दिवसांपूर्वी जप्ती वॉरंट नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु तरीही अनेकांकडून थकबाकी जमा करण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही. अशा थकबाकीदारांवर कायद्याचा बडगा वापरून कसल्याही परिस्थितीत वसुली व्हावी, हा हेतू ठेवून पालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. शहरातील गॅस एजन्सी आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मिळकतदारांचे बँक खाते आणि मोबाईल नंबर मागविले आहेत. त्यांच्याकडून ही यादी आल्यानंतर संबंधित थकबाकीदारांना सुरुवातीला मोबाईलवर थकबाकी किती आहे, यासंदर्भात ‘एसएमएस’ पाठविण्यात येणार आहे. याकडेही दुर्लक्ष केल्यास बँकखात्यातील व्यवहार थांबवून सील करण्यात येणार आहेत. थकबाकीदारांची आर्थिक कोंडी झाल्यानंतर साहजिकच थकबाकी जमा होईल, अशी अपेक्षा वसुली विभागाला आहे. त्यामुळे थकबाकीदारांची सगळ्या बाजूने कोंडी कशी करता येईल, यासाठी कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला जात आहे. आतापर्यंत कनेक्शन आणि घर सील करणे, यावरच कारवाई मर्यादित होती; परंतु आता ही कारवाई तीव्र होणार आहे. ही वुसली मोहीम सुरू झाल्यानंतर केवळ आठ दिवसांत तब्बल २५ लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. ही मोहीम आणखी तीव्र होणार असून, वृत्तपत्रामध्येही थकबाकीदारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षापासून आतापर्यंत एकूण १५ कोटी २० लाख रुपये वसुली मोहिमेतून जमा झाले आहेत. (प्रतिनिधी)मार्च महिन्यामध्ये वसुली मोहीम अतिशय तीव्र करण्यात येणार आहे. थकबाकीदारांची बँकेची खाती सील करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी मिळकतदारांनी आपली सर्व थकबाकी पालिकेत येऊन जमा करावी.-आंबादास वणवे (वसुली अधीक्षक)