शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यासमोरच भरली ‘मंंडई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2016 23:49 IST

‘आतले-बाहेरचे’ वाद चिघळला : राजवाड्याजवळ ‘रास्ता रोको’नंतर राडा; दोघांविरुद्ध मारहाणीची तक्रार

सातारा : येथील राजवाडा भाजीमंडईत बसणारे विक्रेते आणि बाहेर तीनचाकी टेम्पो लावून व्यवसाय करणारे भाजीविक्रेते यांच्यातील वादाने शुक्रवारी सायंकाळी हिंसक वळण घेतले. ‘रास्ता रोको’नंतर मारामारी झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. मारहाणीची तक्रार देण्यासाठी विक्रेत्यांचा संतप्त जमाव शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर रात्री जमला होता. याप्रकरणी पोगरवाडी येथील पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.राजवाडा-मंगळवार तळे रस्त्यावरील मंडईसमोर काही विक्रेते तीनचाकी टेम्पो उभे करून भाजीविक्री करतात. त्यामुळे आतील व्यावसायिकांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो, अशी त्यांची अनेक दिवसांपासूनची तक्रार आहे. पूर्वी एक-दोन टेम्पो तेथे उभे राहत असत; मात्र आता ही संख्या वाढली असून, नऊ-दहा टेम्पो मंडईबाहेर उभे करून भाजीविक्री केली जाते. याप्रश्नी पालिका आणि वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी करून दखल घेतली जात नाही, असे मंडईच्या आतील गाळ्यांमध्ये बसणाऱ्या विक्रेत्यांची तक्रार आहे. शुक्रवारी सायंकाळी विक्रेत्यांनी अखेर या प्रश्नावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. मंडईसमोरील रस्त्यावर टोपल्या ठेवून विक्रेत्यांनी साडेसहाच्या सुमारास मंगळवार तळे रस्ता रोखून धरला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे त्यांनी हे आंदोलन केले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर येऊन मागणीची दखल घ्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. दरम्यान, आंदोलनानंतर बाहेर बसणाऱ्या काही विक्रेत्यांनी मंडईतील गाळेधारकांवर अचानक हल्ला केला आणि मारहाण सुरू केली, अशी त्यांची तक्रार आहे. रात्री आठच्या सुमारास गाळेधारकांचा मोठा जमाव शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर तक्रार देण्यासाठी जमला. मारहाणीत जखमी झालेले रोहित राजेंद्र महाडिक (वय २८, रा. शिवाजीनगर, भैरोबा पायथा, शाहूपुरी) यांनी रीतसर तक्रार दाखल केली. रत्नराज रवींद्र महाडिक आणि रवींद्र चंद्रकांत महाडिक (दोघे रा. पोगरवाडी, ता. सातारा) यांनी आपल्याला मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, राजेंद्र काशिनाथ कदम (रा. सोमवार पेठ) आणि रंजना युवराज महाडिक (रा. सैदापूर, ता. सातारा) हेही जखमी झाल्याचे विक्रेत्यांनी पोलीस ठाण्यासमोर पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)पोलीस विचारतात, तुम्ही एवढे सगळे एकदम तक्रार द्यायला का आलात? पण आज चार जणांना मारहाण झाली. उद्या आणखी कुणाला मारहाण झाली तर आम्ही कुणाकडे जायचे? म्हणूनच सर्वांना यावे लागले. उलट, हा प्रश्न सुटेपर्यंत राजवाडा ते मंगळवार तळे रस्त्यावर पोलिसांनीच सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत वाहन फिरवायला हवे.- रंजना देवगुडे, भाजीविक्रेत्याअतिक्रमणविरोधी पथक येणार...राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले भाजीमंडईच्या बाहेर टेम्पो उभे करून भाजीविक्री करणाऱ्यांची संख्या वाढत असून, त्यामुळे रस्त्याच्या कोंडीबरोबरच गाळाधारकांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, हे गाळेधारकांनी पालिकेला अनेकदा सांगितले आहे. शुक्रवारी या संघर्षाने हिंसक स्वरूप धारण केल्यानंतर विक्रेत्यांनी नगराध्यक्ष विजय बडेकर आणि मंडई विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना दूरध्वनी केला. शनिवारपासून रोज सायंकाळी मंडई परिसरात अतिक्रमणविरोधी पथक येणार असून, रस्त्यावर भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन निकम यांनी दिल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.मंडईसमोर उभे राहणाऱ्या टेम्पोंची संख्या आता तब्बल सात ते दहा झाली आहे. त्यामुळे गाळेधारकांच्या व्यवसायावर परिणाम होतो. ‘आतील गाळे रिकामे असल्याने तुम्हीही आतच बसा,’ असे आम्ही अनेकदा टेम्पोवाल्यांना सांगितले; मात्र ‘तुम्हाला काय करायचे ते करा,’ असे उद्धट उत्तर त्यांनी दिल्यामुळेच आम्ही ‘रास्ता रोको’ केला.- नासीर शेख, भाजीविक्रेते