शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आता शोध बेबी पाटणकरचा...

By admin | Updated: March 13, 2015 23:54 IST

एमडी तस्करी प्रकरण : धर्मराजचा रक्तदाब वाढला

खंडाळा : कण्हेरी (ता. खंडाळा) येथे मुंबई पोलीस दलातील हवालदार धर्मराज काळोखे याच्याकडे ११३ किलो व मुंबई येथे मरिन ड्राईव्ह पोलीस चौकीतील त्याच्या लॉकरमध्ये १२ किलो अमली पदार्थ सापडल्याच्या प्रकरणात महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. मुंबईतून परागंदा झालेली ‘ड्रग पेडलर’ बेबी ऊर्फ शंकुतला पाटणकर हिच्याशी धर्मराजचे अनेक वर्षे घनिष्ट संबंध असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई क्राईम ब्रँच व सातारा पोलीस तसेच मुंबई पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक बेबी पाटणकरच्या शोधात आहे.खंडाळा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या धर्मराज काळोखे याने रक्तदाबाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला खंडाळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तपासणी व औषधोपचारांनंतर पोलिसांनी त्याची रवानगी पुन्हा खंडाळ्याच्या कोठडीत केली. बेबी पाटणकर व धर्मराज काळोखे याचे अनेक वर्षांपासून संबंध असून, यामधूनच काळोखे हा अमली पदार्थाच्या तस्करीत गुंतला असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. मात्र, धर्मराज काळोखे पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देऊन संभ्रम निर्माण करीत असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, तपासासाठी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख खंडाळा पोलीस ठाण्यात आज दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. धर्मराज काळोखे याने कोठे-कोठे वास्तव्य केले, याचा तपास करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रात्री उशिरा रवाना झाले. तत्पूर्वी अधीक्षक डॉ. देशमुख, यांनी तपासी अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंंगटे यांच्याबरोबर सुमारे तीन तास कमराबंद चर्चा केली.तरुणांचा ‘म्याव म्याव’मेफॅड्रॉन अर्थात एमडी या अमली पदार्थाच्या विक्रीच्या दृष्टीने ‘म्याव म्याव’ हा सांकेतिक शब्द तस्करांच्या गोटात रूढ असून, हा अमली पदार्थ बाळगायला सोपा असल्याने विशेषत: तरुणवर्गात ‘म्याव म्याव’ या नावाने प्रसिध्द आहे.