शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पुरस्कृत उंडाळकर’ राष्ट्रवादीच्या अपचनी!

By admin | Updated: September 28, 2014 00:34 IST

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ : रामराजे, शिंदे, उदयनराजे यांची जिल्हा बँकेत खलबते

सातारा / कऱ्हाड : राष्ट्रवादीने ऐनवेळी ‘कऱ्हाड दक्षिण’मधून आ. विलासराव पाटील-उंडाळकर यांना राष्ट्रवादी ‘पुरस्कृत’ करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र कार्यकर्त्यांच्या दबावापुढे राष्ट्रवादीला झुकावे लागले परिणामी काकांनी अपक्ष म्हणून लढण्याचा निर्र्णय घेतला. राष्ट्रवादीने राजेंद्र यादव यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले अन् अर्ज दाखल करतानाच ‘एबी’ फॉर्मही देऊन टाकला.‘कऱ्हाड दक्षिण’मधून काँग्रेसचे उमेदवार म्हणून पृथ्वीराज चव्हाण निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पत्ता कट झाला. परिणामी ते अपक्ष, राष्ट्रवादी पुरस्कृत अथवा राष्ट्रवादी यापैकी एक पर्याय निवडतील, अशी शक्यता निर्माण झाली. शुक्रवार, दि. २६ रोजी दिवसभरात या चर्चांना मोठा ऊत आला. राष्ट्रवादीची नेतेमंडळी काकांनी ‘राष्ट्रवादी पुरस्कृत’ म्हणून लढावे, यासाठी आग्रही होती. मात्र, काकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करावा त्यांना तत्काळ ‘एबी’ फॉर्म देण्यात येईल, असे सांगण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला पुरस्कृत करणार नाही, असा निरोपही रामराजे नाईक-निंबाळकरांकडून देण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा बँकेत रामराजे, शशिकांत शिंदे आणि उदयनराजे यांची बैठक सुरू झाली. तिघांमध्ये खलबते होऊनही निर्णय होऊ शकला नाही. ‘पुरस्कृत’ होण्यास नकार दिल्यामुळे अखेर विलासराव पाटील-उंडाळकरांपुढे अपक्ष म्हणून लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. मात्र, उदयनराजेंनी यादवासाठी आग्रह धरला आणि त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. (प्रतिनिधी)