शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यांतून प्रबोधनाचा जागर

By admin | Updated: September 20, 2015 23:44 IST

पेठा गजबजल्या : ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक विषयांचा समावेश

सातारा : उत्सव साजरे करताना त्यातून समाजप्रबोधनही झाले पाहिजे, हा उद्देश लक्षात ठेवून यंदा साताऱ्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक, पौराणिक देखावे केले आहेत. जिवंत व हलत्या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत असून सायंकाळी देखावे पाहण्यासाठी शाहूनगरी गजबजून जात आहे.भव्य देखाव्यांची परंपरा असलेल्या सातारा शहरातील पोवई नाका येथे पोवई नाका येथील शिवाजी सर्कल गणेशोत्सव मंडळाने यंदा ‘श्री कृष्णाचे विश्वरूप दर्शन’ हा पौराणिक हलता देखावा सादर केला आहे. पाच अश्व असलेल्या रथात अर्जुन विराजमान असल्याचे दाखविले आहे. तर रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने धारण केलेले विश्वरूप असा हा भव्य स्वरूपातील हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिक्षक बँकेने गणपतीसमोर यंदा ‘बालशिवरायांचा न्यायनिवाडा’ हा विषय घेऊन भव्य हलता देखावा तयार केला आहे. एका पाटलाने केलेल्या दुष्कृत्याबद्दल त्याला बालशिवरायांनी केलेली शिक्षा या देखाव्यातून दाखविण्यात आली आहे. विविध विषय घेऊन करण्यात आलेले देखावे पाहताना उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटते. कर्मवीर पथावरील एका मंडळाने शिवालयाची प्रतिकृती तयार केली आहे. हिमालयात ध्यानस्थ बसलेले शंभूमहादेव असा हा भव्य देखावा विविधरंगी प्रकाशझोतात लक्ष वेधून घेत आहे. शाहू चौकात मल्हारी मार्तंड रूपातील गणेशमूर्ती लक्षवेधक आहे. जेजुरी गडाची प्रतिकृती तयार करण्यात आली असून गडाबाहेर हातात तलवार घेऊन उभा असलेला शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा यामुळे एक वेगळीच छाप पडत आहे. देखावे पाहण्यासाठी सातारकर घराबाहेर पडू लागले आहेत. (प्रतिनिधी) रात्रीच्यावेळी रस्त्यांवर गर्दी...---शहरातील अनेक मंडळांनी भव्य देखावे तयार केले आहेत. ऐतिहासिक, पौराणिक देखावे पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. यंदा डॉल्बीचा गोंगाट नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकही देखावे पाहण्यासाठी बाहेर पडताना दिसत आहेत.